
चेन्नई सुपर किंग्सने आपल्या एमए चिदंबरम स्टेडियम या घरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सला रोखण्यात यश मिळवलं आहे. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेणाऱ्या चेन्नईने कोलकाताला 20 ओव्हरमध्ये 137 धावावंर रोखलं. चेन्नईच्या गोलंदाजांसमोर कोलकाताचे तोडीस तोड फलंदाज निष्प्रभ ठरले. कोलकाताच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मात्र कॅप्टन श्रेयस अय्यर याने एकट्याने लाज राखली. श्रेयसने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. आता चेन्नईसमोर विजयासाठी 138 धावांचं आव्हान आहे. आता चेन्नई हे आव्हान पूर्ण करुन या हंगामातील तिसरा विजय मिळवते की केकेआर प्रतिस्पर्धी संघांच्या घरच्या मैदानात तिसरा सामना जिंकते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. कोलकाताने जिंकलेले दोन्ही सामने हे दुसऱ्या टीमच्या होम ग्राउंडवर जिंकले आहेत.
कोलकाताकडून कॅप्टन श्रेयस अय्यर याने 32 बॉलमध्ये 3 चौकारांसह सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. सुनील नरेन 27, अंगीकृष रघुवंशी 24, रमनदीप सिंह 13 आणि आंद्रे रसेल याने 10 धावा केल्या. कोलकाताचे हे फलंदाज आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करण्यात अपयशी ठरले. तर इतरांनी निराशा केली. टीम अडचणीत असताना रिंकू सिंहकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रिंकू 9 धावांवर आऊट झाला. वेंकटेश अय्यर आणि अनूकुल रॉय या दोघांनी 3-3 धावा जोडल्या. फिलिप सॉल्ट आणि मिचेल स्टार्क या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर वैभव अरोर 1 धावेवर नाबाद परतला. चेन्नईकडून रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. मुस्तफिजूर रहमान याने 2 विकेट्स घेत पुन्हा पर्पल कॅप मिळवली. तर महीश तीक्षणा याने 1 विकेट घेतली.
चेन्नईची कोलकाता विरुद्ध अफलातून बॉलिंग
Innings Break ‼️
Some tight & disciplined bowling from Chennai Super Kings restrict #KKR to 137/9.
Will it be defended or #CSK register another win at home 🤔
Scorecard ▶ https://t.co/5lVdJVscV0 #TATAIPL | #CSKvKKR pic.twitter.com/zUR3IMuOeS
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2024
कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षाना.