
आयपीएल 2024 स्पर्धेतील 39 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 6 गडी राखून पराभूत केलं. या विजयासह लखनौ सुपर जायंंट्सने टॉप 4 मध्ये एन्ट्री मारली आहे. लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या डावात पडणारं दव पाहून केएल राहुलने हा निर्णय घेतला होता. पण चेन्नई सुपर किंग्स 170 धावांच्या आसपास रोखणं शक्य झालं नाही. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेच्या फटकेबाजीपुढे कोणाचं काही चाललं नाही. ऋतुराज गायकवाडने 60 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने नाबाद 108 धावा केल्या. तर शिवम दुबेने 27 चेंडूत 66 धावा केल्या. या खेळीत 3 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश आहे. ऋतुराज आणि दुबेच्या खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्सला 200 पार धावा करण्यात यश आलं. चेन्नई सुपर किंग्सने दिलेलं 211 धावांचं आव्हान गाठताना लखनौची सुरुवातच निराशाजनक राहिली. पण मार्कस स्टोयनिसचं वादळ चेपॉकच्या मैदानात घोंघावत होतं. मार्कस स्टोयनिसने 124 धावांची नाबाद खेळी करून लखनौला जिंकून दिलं.
क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल ही जोडी विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी तंबूत उतरले. मात्र दीपक चाहरच्या पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर क्विंटन डी कॉक बाद झाला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. कर्णधार केएल राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र 16 धावांवर असताना मुस्तफिझुर रहमानने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. तिसऱ्या गड्यासाठी मार्कस स्टोइनिस आणि देवदत्त पडिक्कल यांनी चांगली भागीदारी केली. पथिरानाच्या गोलंदाजीवर 13 धावा करून देवदत्त पडिक्कल बाद झाला. पण मार्कस स्टोयनिस शेवटपर्यंत उभा राहिला आणि 124 धावांची नाबाद खेळी केली. मार्कस स्टोयनिसला बाद करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.