AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, CSK vs SRH : चेन्नई सुपर किंग्सचं सनरायझर्स हैदराबादसमोर 213 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?

आयपीएल 2024 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरु आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत हैदराबादने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 3 गडी गमवून 212 धावा केल्या. आता विजयासाठी दिलेलं 213 धावांचं आव्हान सनरायझर्स हैदराबाद गाठतं का हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे.

IPL 2024, CSK vs SRH : चेन्नई सुपर किंग्सचं सनरायझर्स हैदराबादसमोर 213 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
Image Credit source: Twitter
| Updated on: Apr 28, 2024 | 9:27 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेतील 46 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. चेन्नई सुपर किंग्सला विजयाच्या ट्रॅकवर परतण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. चेन्नई सुपर किंग्स सध्या सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकत 20 षटकात 3 गडी गमवून 212 धावा केल्या. तसेच विजयासाठी 213 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान आता सनरायझर्स हैदराबाद गाठणार का? हा प्रश्न आहे. सनरायझर्स हैदराबादने हा सामना जिंकला तर थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. दुसऱ्या डावात दव फॅक्टर खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे फॉर्मात असलेल्या ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेन्रिक क्लासेन, मार्करम यांच्यासमोर गोलंदाजी करण्याचं आव्हान आहे. पथिराना आणि श्रेयस देशपांडेच्या स्पेलवर सर्वकाही अवलंबून आहे.

चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात हवी तशी झाली नाही. अजिंक्य रहाणेला या सामन्यातही काही फॉर्म गवसला नाही. ओपनिंगला आलेला अजिंक्य रहाणे चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरला. अजिंक्य रहाणेनं 12 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 9 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर फटका मारताना शहाबाजच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि डेरिल मिचेल यांनी मोर्चा सांभाळला. दोघांच्या भागीदारीने हैदराबादच्या गोलंदाजांचा घाम निघाला. दोघांनी 107 धावांची भागीदारी केली. ऋतुराज गायकवाड 98 धावा करून बाद झाला.  त्याने 54 धावात 98 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन

दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.