
आयीपएलच्या 17 व्या मोसमातील 56 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने असणार आहेत. ऋषभ पंत याच्याकडे दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व असणार आहे. तर संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सची सूत्रं सांभाळणार आहे. राजस्थानने प्लेऑफसाठी किमान 16 पॉइंट्स मिळवले आहेत. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीला प्लेऑफ गाठण्यासाठी उर्वरित 3 सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे दिल्लीसाठी राजस्थान विरुद्धचा सामना हा ‘करो या मरो’ असा असणार आहे. राजस्थान 10 पैकी 8 सामने जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर दिल्ली 11 पैकी 5 सामन्यात विजय मिळवून सहाव्या स्थानी आहे.
दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना मंगळवारी 7 मे रोजी होणार आहे.
दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे.
दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.
दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरी चॅनेल्सवर पाहता येईल.
दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.
दिल्ली कॅपिट्ल्स टीम : ऋषभ पंत (कॅप्टन), जेक फ्रेझर मॅकगर्क, डेव्हिड वॉर्नर, अभिषेक पोरेल, रिकी भुई, यश धुल, शाई होप, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कुशाग्रा, स्वस्तिक चिकारा, इशांत शर्मा, झाये रिचर्डसन, रसिक दार सलाम, विकी ओस्तवाल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, कुलदीप यादव, प्रवीण यादव. दुबे, खलील अहमद, सुमित कुमार, अक्षर पटेल, मिचेल मार्श आणि ललित यादव.
राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोव्हमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, रविचंद्रन अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.