नाद करा पण रिंकूचा कुठ | 24 कोटींच्या स्टार्कला रिंकू सिंहने दाखवलं आभाळ, पाहा Video 

Rinku Singh Six Mitchel Starc : आयपीएल 2024 आधी रिंकू सिंहने राडा घातलाय, लिलावामध्ये सर्वात महागडा ठरलेल्या स्टार्कला त्याने गगनचुंबी षटकार मारला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नाद करा पण रिंकूचा कुठ | 24 कोटींच्या स्टार्कला रिंकू सिंहने दाखवलं आभाळ, पाहा Video 
| Updated on: Mar 20, 2024 | 4:16 PM

मुंबई : आयपीएल 2024 ला सुरूवात व्हायला दोन दिवस बाकी आहेत. सर्व संघांनी जोरदार तयारी केली असून आता स्पर्धेला सुरूवात होण्याची सगळेजण वाट पाहत आहे. 22 मार्चला पहिला सामना साएसके आणि आरसीबीमध्ये पार पडणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा स्टार खेळाडू रिंकू सिंह याने खळबळ उडवली आहे. आयपीएलच्या इतिहासामधील सर्वात महागडा (24.75 कोटी) ठरलेल्या मिचेल स्टार्क याला कडक सिक्सर मारला आहे. भल्याभल्यांच्यां दांड्या गुल करणाऱ्या स्टार्कला रिंकूने आभाळ दाखवलं. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंट्रा स्क्वॉड सराव सामन्यामध्ये मिचेल स्टार्क हा गोलंदाजी करत होता तर स्ट्राईकवर रिंकू सिंह होता. स्टार्कने टाकलेला फुल टॉसवर रिंकूने गरगरीत षटकार मारला. चेंडू बसल्यानंतर डायरेक्ट स्क्वेअर लेगला स्टेडियममध्ये गेला. रिंकूने मारलेल्या या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. रिंकूची आयपीएलमधील सॅलरी ही 55 लाख आहे. मात्र लाखाचा खेळाडू करोडोंवर भारी पडलाय.

पाहा व्हिडीओ:-

 

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पहिला सामना हा दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 मार्चला सनरायझर्स हैदराबाद या संघाविरूद्ध होणार आहे. हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होईल. या इंट्रा-स्क्वॉड मॅचमध्ये मिचेल स्टार्कने सुरूवातीला विकेट घेतल्या होत्या. पण रिंकूने मोठे फटके खेळत आपणस आयपीएलसाठी तयार असल्याचं दाखवून दिलं.

कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल फायनल संंघ 2024 नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर (C), जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क , अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, गुस ऍटकिन्सन, साकिब हुसेन.