KKR vs RCB : आरसीबीने केकेआर विरुद्ध टॉस जिंकला, पहिले बॅटिंग कुणाची?

| Updated on: Apr 21, 2024 | 3:48 PM

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru Toss : कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आयपीएलच्या 17 व्या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकला आहे.

KKR vs RCB : आरसीबीने केकेआर विरुद्ध टॉस जिंकला, पहिले बॅटिंग कुणाची?
kkr vs rcb ipl 2024 toss,
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमात आज 21 एप्रिल रोजी डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स आमनेसामने आहेत. हे दोन्ही संघांचा या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. फाफ डु प्लेसीस आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. तर श्रेयस अय्यर याच्याकडे केकेआरची सूत्रं आहेत. या 36 व्या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. आरसीबीने टॉस जिंकला. कॅप्टन फाफ डु प्लेसीस याने फिल्डिंगचा निर्णय घेत कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

हेड टु हेड आकडे

बंगळुरु विरुद्ध कोलकाता हे दोन्ही संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 33 वेळा आमनेसामने आले आहेत. कोलकाताने या 33 सामन्यांपैकी 19 सामन्यात विजय मिळवला आहे. तर आरसीबीने 14 वेळा विजय मिळवला आहे. तसेच कोलकातामध्ये झालेल्या 6 सामन्यात उभयसंघाची कामगिरी बरोबरीची राहिली आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 3-3 सामने जिंकले आहेत. तसेच 2021 पासून दोन्ही संघात 7 सामने झाले आहेत. या 7 पैकी 5 सामने कोलकाताने जिंकलेत. तर 2 सामन्यात आरसीबी यशस्वी ठरली आहे.

आरसीबीच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये 3 बदल

कोलकाताने आरसीबी विरुद्धच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कॅप्टन श्रेयस अय्यर याने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तर दुसऱ्या बाजूला मात्र आरसीबीने 3 बदल केले आहेत. आरसीबी टीममध्ये ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन, मोहम्मद सिराज आणि करण शर्मा या तिघांचं कमबॅक झालं आहे.

दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने

दरम्यान आरसीबी आणि केकेआर दोन्ही संघ या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. याआधी उभयसंघात 29 मार्च रोजी 17 व्या मोसमातील 10 वा सामना झाला होता. केकेआरने हा सामना 7 विकेट्सने जिंकला होता. आरसीबीने विजयासाठी दिलेलं 183 धावांचं आव्हान केकेआरने 16.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं होतं. आता आरसीबीसमोर या सामन्यात विजय मिळवून गेल्या पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे.

आरसीबीसाठी ‘करो या मरो’

दरम्यान केकेआर 6 सामन्यात 4 विजय आणि 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. तर आरसीबीने 7 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये 2 गुणांसर शेवटच्या अर्थात दहाव्या स्थानी आहे. आरसीबीने गेले 5 सामने गमावले आहेत. त्यामुळे आरसीबीला स्पर्धेतील आव्हान कायम राखयाचं असेल, तर केकेआर विरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल आणि मोहम्मद सिराज.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.