IPL 2024, KKR vs RR : कोलकात्याचं राजस्थानसमोर विजयासाठी 224 धावांचं आव्हान

| Updated on: Apr 16, 2024 | 9:26 PM

आयपील 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात धावा केल्या. विजयासाठी 224 धावांचं आव्हान दिलं आहे. आता राजस्थानसमोर हे आव्हान गाठण्याचं मोठं आव्हान आहे.

IPL 2024, KKR vs RR : कोलकात्याचं राजस्थानसमोर विजयासाठी 224 धावांचं आव्हान
Image Credit source: Twitter
Follow us on

आयपीएल स्पर्धेतील 31 वा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला. कर्णधार संजू सॅमसनने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. सुनील नरीनची बॅट या सामन्यात चांगलीच तळपली. 29 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्यानंतरही सुनील नरीनने आपली आक्रमक फलंदाजी कायम ठेवली. 49 चेंडूत 100 धावा केल्या. सुनील नरीनला बाद करण्यात ट्रेंट बोल्ट यश आलं. मात्र तिथपर्यंत त्याने 109 धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीमुळे कोलकाता नाईट रायडर्सला 20 षटकात 6 गडी गमवून 223 धावा करता आल्या. यासह राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 224 धावांचं आव्हान मिळालं आहे. आता हे आव्हान राजस्थान रॉयल्स गाठणार का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. या सामन्यात विजयी संघ गुणतालिकेत थेट अव्वल स्थान गाठणार आहे. त्यामुळे ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सकडून फिलीप सॉल्टने 10, सुनील नरीनने 109, अंगकृष रघुवंशीने 30, श्रेयस अय्यरने 11, आंद्रे रसेलने 13, वेंकटेश अय्यर 8 धावा करून बाद झाला. राजस्थानकडून आर अश्विनने सर्वात महागडा स्पेल टाकला. 4 षटकात 49 धावा देत एकही गडी बाद करता आला नाही. युझवेंद्र चहलनेही महागडा स्पेल टाकला. 4 षटकात 54 धावा दिल्या मात्र एक गडी बाद करण्यात यश मिळालं. ट्रेंट बोल्टने 4 षटकात 31 धावा देत एक गडी बाद केला. तर आवेश खानने 4 षटकात 35 धावा देत 2 गडी बाद केले. कुलदीप सेनने 4 षटकात 46 धावा देत 2 गडी बाद केले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरीन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.