
आयपीएलच्या इतिहासात 5 वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सची 17 व्या मोसमातही निराशाजनक सुरुवात झाली. मुंबई इंडियन्स 2012 पासून ते आतापर्यंत आपला सलामीचा सामना जिंकण्यात अपयशी ठरली. रोहित शर्मा याच्याकडे असलेली कॅप्टन्सी काढून हार्दिक पंड्या याला नेतृत्वाची जबाबदारी दिली. मात्र हार्दिकलाही मुंबईला आपल्या नेतृ्त्वात विजयी सुरुवात करुन देता आली नाही. मुंबईच्या या मोसमातील कामगिरीबाबत मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने मौन सोडलं आहे. क्लब प्रेयरी फायर पॉडकास्टमध्ये रोहितने मुंबईच्या संथ सुरुवातीचं प्रमुख कारण सांगितलं. तसेच रोहितने मुंबईसह कर्णधार म्हणून प्रवास कसा राहिला, हे सुद्धा सांगितलं.
मुंबई इंडियन्सची गेल्या काही वर्षात अशीच स्थिती राहिली असल्याचं रोहित शर्माने म्हटलं. आम्ही हंगामातील सुरुवात फार संथ केलीय, पण स्पर्धा पुढे जाता असताना समीकरणंही बदलली. माझ्या हिशोबाने हे तेव्हाच घडतं जेव्हा टीममध्ये नवे खेळाडू असताता. गेल्या 10 वर्षात टीमचा कर्णधार कायम होता. गेल्या काही वर्षात बदल झाले. ज्यामुळे खेळावर परिणाम झाला.
रोहितनुसार कर्णधार असताना तो एका माईंडसेटने गेम करायचा. या दरम्यान त्याने इतरांचे विचार लक्षात घेतले. मला माहितीय की आयपीएलमध्ये कशाप्रकारे खेळलं जातं आणि टीमला यशस्वी करण्यासाठी काय आवश्यक आहे, असं रोहित म्हणाला. याच कारणांमुळे काही गोष्टी साध्य करण्यासाठी वेळ लागतो.
रोहितने एक बाब स्पष्ट केली की टीममध्ये विदेशी खेळाडूंसह भारतीय खेळाडूही आहेत. मला यापेक्षा जास्त वानखेडे स्टेडियमबाबत माहिती आहे, कारण मी माझ्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवातच इथून केलीय. मी इथेच वाढलोय. त्यामुळे मला माहितीय की विकेट कशी आहे आणि स्थितीनुसार काय करायचंय.
दरम्यान रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचं 2013 ते 2023 पर्यंत नेतृत्व केलं. रोहितने या दरम्यान मुंबईला आपल्या कॅप्टन्सीत एकूण 5 वेळा आयपीएल चॅम्पियन केलं. रोहितने आपल्या कॅप्टन्सीत मुंबईला 2013, 2015, 2017, 2019 आणि 2022 साली ट्रॉफी जिंकून दिली.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.