MI vs KKR : कोलकात्याने पुन्हा एकदा मुंबईला पाजलं पराभवाचं पाणी, केकेआर प्लेऑफसाठी पात्र

आयपीएल 2024 स्पर्धेतील 60 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने लागला. मात्र तरीही पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

MI vs KKR : कोलकात्याने पुन्हा एकदा मुंबईला पाजलं पराभवाचं पाणी, केकेआर प्लेऑफसाठी पात्र
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 12, 2024 | 12:35 AM

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 60 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. वरुण चक्रवर्ती आणि सुनिल नरीनच्या फिरकीपुढे मुंबई गोलंदाजी फटकेबाजीसाठी चाचपडताना दिसले. इशान किशन वगळता एकही फलंदाज मोठी धावसख्या उभारू शकला नाही. त्यामुळे धावा आणि चेंडू यांच्यातील अंतर वाढत गेलं. सूर्यकुमार यादव आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर बाद होताच हा सामना खऱ्या अर्थाने गमवला गेला. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 16 षटकात 7 गडी गमवून 157 धावा केल्या. तसेच विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं. पण मुंबई इंडियन्सचा संघ 8 गडी गमवून 139 धावा करू शकला. कोलकात्याने दिलेलं आव्हान गाठताना मुंबई इंडियन्सकडून इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी मिळून 65 धावांची भागीदारी केली. मात्र इशान किशन बाद होताच डाव गडगडला. रोहित शर्माही काही खास करून शकला नाही. त्याचा इम्पॅक्ट या सामन्यातही पडला नाही 24 चेंडूत 19 धावा केल्या आणि बाद झाला. त्याचा स्ट्राईक रेट हा 79.17 इतका राहिला. सूर्यकुमार यादवकडून या सामन्यात अपेक्षा होत्या मात्र तोही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. त्याने 14 चेंडूत 1 धावा केल्या. त्याचा इकोनॉमी रेट हा 78.57 इतका होता.

कर्णधार हार्दिक पांड्या विजयाच्या वेशीवर नेईल अशी अपेक्षा होती. पण तोही फक्त 2 धावा करून तंबूत परतला. वरुण चक्रवर्तीने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढलं. तर टिम डेविड फटकेबाजी करून धावा आणि चेंडूमधील अंतर कमी करेल असं वाटत होतं. मात्र तसं काही झालं नाही. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. आंद्रे रसेलने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. तिलक वर्माने एका बाजूने लढा देण्याचा प्रयत्न केला. मात्र धावा आणि चेंडूतील अंतर प्रत्येक एका धावेनंतर वाढत होतं. रनरेट वाढताना मोठ्या फटकेबाजीसाठी चांगलं षटक मुंबईच्या वाटेला आलं नाही. त्यानंतर रमण धीरने चांगली फटकेबाजी केली. 6 चेंडूत 17 धावा केल्या मात्र विजय मिळवू शकला नाही.

स्पर्धेतून मुंबई इंडियन्सचं आव्हान असंही संपुष्टात आलं आहे. मात्र आत्मसन्मानासाठीच्या लढाईतही पराभव सहन करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सचा आता फक्त एक सामना शिल्लक राहिला आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफसाठी क्वॉलिफाय होणारा पहिला संघ ठरला आहे. कोलकात्याने या सामन्यातील विजयानंतर 18 गुण कमवले असून पहिल्या स्थानावर आहे. आता तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी सहा संघांमध्ये चुरस आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.