IPL 2024, MI vs PBKS : मुंबई इंडियन्सकडून सूर्या तळपला, पंजाबला विजयासाठी 193धावांचं आव्हान

आयपीएल 2024 स्पर्धेतील 33 वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबई इंडियन्स 7 गडी गमवून 192 धावा केल्या.

IPL 2024, MI vs PBKS : मुंबई इंडियन्सकडून सूर्या तळपला, पंजाबला विजयासाठी 193धावांचं आव्हान
Image Credit source: Twitter
| Updated on: Apr 18, 2024 | 9:26 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांना या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली आणि मुंबई इंडियन्सला गोलंदाजीचं निमंत्रण दिलं. मुंबई इंडियन्सने 7 गडी गमवून 192 धावा केल्या आणि विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं आहे. आता हे आव्हान पंजाब किंग्स गाठते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सूर्यकुमार यादवने पंजाब किंग्सविरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे मुंबई इंडियन्सला फायदा झाला. पंजाब किंग्सकडून हर्षल पटेल, सॅम करन आणि कगिसो रबाडा यांनी चांगली गोलंदाजी केली. हर्षल पटेलने 3, सॅम करनने 2 आणि कगिसो रबाडाने 1 गडी बाद केला.

मुंबई इंडियन्सचा डाव

मुंबई इंडियन्सकडून इशान किशन आणि रोहित शर्मा ही जोडी मैदानात उतरली. मात्र संघाच्या 18 धावा असताना पहिला धक्का बसला. इशान किशन 8 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची जोडी जमली. या दोघांनी 81 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा 25 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. यात 3 षटकार आणि 2 चौकार मारले. सॅम करनच्या गोलंदाजीवर हरप्रीत ब्रारने झेल पकडला. सूर्यकुमार यादव 53 चेंडूत 78 धावा करून तंबूत परतला. त्याने 3 षटकार आणि 7 चौकार ठोकले.  सॅम करनच्या गोलंदाजीवर प्रभसिमरन सिंगने जबरदस्त झेल पकडला. टीम डेविड 6 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. त्याने 2 चौकार आणि एक षटकार मारला. शेफर्डकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र अवघी 1 धाव करून बाद झाला. शेवटच्या चेंडूवर मोहम्मद नबी उतरला होता. मात्र रनआऊट होत तंबूत परतला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.