IPL 2024 MI vs SRH Live Streaming : हैदराबादसाठी निर्णायक सामना, मुंबई गेल्या पराभवाचा वचपा घेणार?

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Streaming : मुंबई विरुद्ध हैदराबाद दोन्ही संघांची ही या आयपीएलच्या 17 व्या मोसमात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे.

IPL 2024 MI vs SRH Live Streaming : हैदराबादसाठी निर्णायक सामना, मुंबई गेल्या पराभवाचा वचपा घेणार?
pat cummins and hardik pandya mi vs srh,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 6:45 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 55 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे हैदराबादची सू्त्रं आहेत. हैदराबादचा हा 11 वा आणि मुंबईचा 12 वा सामना असणार आहे. मुंबईने 11 पैकी 3 सामने जिंकलेत. मुंबई 6 पॉइंट्ससह सर्वात शेवटी 10 व्या स्थानी आहे. तर हैदराबाद 6 विजयासह चौथ्या स्थानी विराजमान आहे. हैदराबादसाठी हा सामना प्लेऑफच्या हिशोबाने महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे हैदराबाद विजयासाठी जोरदार प्रयत्नात असणार आहे. तर मुंबई पराभवाचा वचपा घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. याआधी हे दोन्ही संघ 27 मार्च रोजी भिडले होते. तेव्हा हैदराबादने मुंबईवर 31 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता 55 व्या सामन्यात उभयसंघात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना केव्हा?

मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना सोमवारी 6 मे रोजी होणार आहे.

मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना कुठे?

मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.

मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना मोबाईलवर फुकटात कुठे पाहायला मिळणार?

मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडेय, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा आणि उमरान मलिक.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.