
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 192 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादव याने 53 बॉलमध्ये 7 चौकार आणि 3 सिक्ससह सर्वाधिक 78 धावांची खेळी केली. तर रोहित शर्मा याने 25 बॉलमध्ये 144 च्या स्ट्राईक रेटने 3 सिक्स आणि 2 चौकारांच्या मदतीने 25 बॉलमध्ये 36 धावांची खेळी केली. रोहित शर्माच्या खेळीदरम्यान हार्दिक पंड्या याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. हार्दिकचा हा व्हायरल झालेला व्हाडीओ पाहून तो आनंद व्यक्त करतोय की त्याचा जळफळाट झालाय? असा प्रश्नही नेटकऱ्यांना पडलाय.
पंजाबकडून हर्षल पटेल मुंबईच्या डावातील 11 वी ओव्हर टाकायला आला. रोहित शर्माने आपल्या खेळीतील तिसरा आणि शेवटचा सिक्स 11 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर ठोकला. रोहितने एकाहाताने सिक्स खेचला. रोहितने मारलेला सिक्स कट टु कट गेला. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंडया हा डगआऊटच्या इथे बसला होता. हार्दिकने रोहितचा हा फटका पाहून मांडीवर हात मारला. हार्दिकने खऱ्या अर्थाने रोहितच्या या फटक्याला दाद दिली. मात्र हार्दिकच्या चेहऱ्यावरील हावभावामुळे त्याने नक्की जल्लोष केला की आणखी काय? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला.
दरम्यान रोहितचा पंजाब किंग्स विरुद्धचा हा सामना त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील 250 वा सामना ठरला आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये 250 सामने खेळणारा दुसराच खेळाडू ठरला आहे. रोहितच्या आधी महेंद्रसिंह धोनी याने असा कारनामा केला आहे.
हार्दिकची रिएक्शन व्हायरल
One handed six by Rohit Sharma 😭😻
pic.twitter.com/mLxJPnLsaB— ` (@shivv0037) April 18, 2024
पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.
मुंबई इंडियन्स प्लेईंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल आणि जसप्रीत बुमराह.