PBKS vs MI, IPL 2024 : मुंबई चौथ्या विजयासाठी सज्ज, पलटणसमोर पंजाबचं आव्हान

Punjab Kings vs Mumbai Indians : मुंबई इंडियन्स पंजाब किंग्स विरुद्ध त्यांच्याच होम ग्राउंडमध्ये खेळणार आहे. त्यामुळे पंजाबला होम एडव्हानटेज असणार आहे. त्यामुळे मुंबईचा चांगलाच कस लागणार आहे.

PBKS vs MI, IPL 2024 : मुंबई चौथ्या विजयासाठी सज्ज, पलटणसमोर पंजाबचं आव्हान
mumbai indians in punjab,
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 18, 2024 | 12:05 AM

हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे. पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना हा 18 एप्रिल रोजी होणार आहे. शिखर धवन पंजाब किंग्सच्या अनुपस्थितीत सॅम करन नेतृत्व करु शकतो. पंजाब आणि मुंबई या दोन्ही संघांची या मोसमात सारखीच स्थिती आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा हा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना चांगलाच चुरशीच सामना पाहायला मिळू शकतो.

पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये ताज्या आकडेवारीनुसार अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानी आहेत. पंजाब आणि मुंबईने दोन्ही संघांनी प्रत्येकी 6 सामने जिंकले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 4 सामने गमावले आहेत. तर 2 सामने जिंकण्यात यश आलं आहे. दोघांची स्थिती सारखी असली तरी पंजाबचा नेट रनरेट हा मुंबईच्या तुलनेत काही अंशी चांगला आहे. त्यामुळे पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईच्या पुढे आठव्या स्थानी आहे. आता गुरुवारी 17 एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यात जिंकणारी टीम ही पुढे जाईल. त्यामुळे पंजाब आणि मुंबई या दोघांमध्ये काँटे की टक्कर असणार हे  जवळपास निश्चित आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे.

पंजाब किंग्स टीम : शिखर धवन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, हरप्रीत सिंग भाटिया, प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, जितेश शर्मा (विकेटकीपर) , सॅम कुरान, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, शिवम सिंग, सिकंदर रझा, अथर्व तायडे, ख्रिस वोक्स, अर्शदीप सिंग, राहुल चहर, नाथन एलिस, हरप्रीत ब्रार, विद्वथ कवेरप्पा, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, प्रिन्स चौधरी, आशुतोष शर्मा, विश्वनाथ सिंग आणि तनय त्यागराजन.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.