
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि फलंदाज हिटमॅन अर्थात रोहित शर्मा याने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध इतिहास रचला आहे. रोहित शर्मा याने आयपीएलच्या कारकीर्दीतील 250 व्या सामन्यात अविस्मरणीय कामगिरी केली आहे. रोहित आपल्याच माजी सहकाऱ्याचा रेकॉर्ड उध्वस्त केला आहे. रोहित शर्मा यासह मुंबई इंडियन्सचा सिक्सर किंग ठरला आहे. रोहित शर्मा याने मुंबईचा माजी फलंदाज किरॉन पोलार्डला पछाडलं आहे.
रोहितने पंजाब किंग्स विरुद्ध 25 बॉलमध्ये 36 धावा केल्या. रोहितने या खेळीत 2 चौकार आणि 3 सिक्स ठोकले. रोहितने या 3 सिक्ससह महारेकॉर्ड केला. रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक सिक्स ठोकणारा फलंदाज ठरला आहे. रोहितने किरॉन पोलार्डचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. रोहितच्या नावावर आता पंजाब विरुद्धच्या 3 सिक्ससह एकूण 224 सिक्सची नोंद झाली आहे. रोहितने हे सिक्स मुंबईकडून खेळताना ठोकले आहेत. किरॉन पोलार्ड याने 223 सिक्स ठोकले आहेत.
रोहित शर्मा – 224
किरॉन पोलार्ड -223
हार्दिक पंड्या – 105
ईशान किशन – 103
सूर्यकुमार यादव – 98
𝗧𝗪𝗢 𝗧𝗪𝗘𝗡𝗧𝗬 𝗙𝗢𝗨𝗥* – Most 𝕊𝕀𝕏𝔼𝕊 for MI 🤝 RS45#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #PBKSvMI pic.twitter.com/PLG0WLKsdW
— Mumbai Indians (@mipaltan) April 18, 2024
दरम्यान मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 192 धावा केल्या. मुंबईकडून रोहितशिवाय सूर्यकुमार यादव याने 53 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 7 चौकारांच्या मदतीने 78 धावा केल्या. तर तिलक वर्मा याने 18 बॉलमध्ये 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 34 धावा केल्या. तर टीम डेव्हिड आणि कॅप्टन हार्दिक पंड्या या दोघांनी अनुक्रमे 14 आणि 10 धावा केल्या. तर पंजाबकडून हर्षल पटेल याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कॅप्टन सॅम करन याने दोघांना आऊट केलं. तर कगिसो रबाडाच्या खात्यात 1 विकेट गेली.
पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.
मुंबई इंडियन्स प्लेईंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल आणि जसप्रीत बुमराह.