Rohit Sharma: हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर मानहानिकारक विक्रम, मोठी खेळी खेळण्यात अपयश
ipl 2024 rohit sharma: रोहित शर्मा आयपीएल 2024 मध्ये एकही अर्धशतकी खेळी खेळू शकला नाही. तो अर्धशतक करु शकला नाही तरी त्याचा स्ट्राइक रेट चांगला आहे. या हंगामात त्याने 4 सामन्यात 171 च्या स्ट्राईक रेटने 118 धावा केल्या आहेत. तसेच आयपीएल 2024 त्याची सर्वोच्च धावसंख्या 49 आहे.

आयपीएलमध्ये रोहित शर्मा चांगलाच चर्चेत असतो. मुंबई इंडियन्सने त्याचे कर्णधारपद काढल्यानंतर एमआयचे फॅन्स नाराज झाले होते. त्या नाराजीचा सामना अजूनही हार्दिक पांड्याला करावा लागत आहे. आयपीएलमध्ये रोहित शर्मा धडाकेबाज फलंदाजी करत आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला गेलेल्या सामन्यात त्याने 27 चेंडूत 49 धावांची खेळी केली. त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे त्याला ‘हिटमॅन’ म्हटले जाते. परंतु तो आयपीएलमधील 43 वे अर्धशतक करु शकला नाही. 1 धावाने त्याचे अर्धशतक हुकले. एक धाव कमी असताना रोहित शर्मा अर्धशतक करु न शकण्याची रोहितची ही पहिली वेळ नाही.
आयपीएलमध्ये रोहित शर्मा सर्वाधिक वेळा 49 धावांवर बाद झालेला फलंदाज बनला आहे. त्याने 20 वेळा 40 धावांचा टप्पा ओलांडला आहे, पण त्याला पन्नासही करता आले नाही. त्याचा नावावर हा वेगळाच विक्रम झाला आहे. रोहितने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत तिसऱ्यांदा 49 धावांवर बाद झाला आहे.
कधी कधी झाला 49 धावांवर बाद
रोहितने 2010 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध पहिल्यांदा 49 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर 2011 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात 1 धावाने त्याचे अर्धशतक पूर्ण करता आले नाही. रोहित शर्मानंतर या यादीत डेव्हिड वॉर्नर, ख्रिस गेल, ब्रेंडन मॅक्युलम, संजू सॅमसन आणि ख्रिस लिन यांचाही समावेश आहे, ज्यांनी आयपीएल कारकिर्दीत दोनदा 49 धावांत विकेट गमावल्या आहेत. रोहित शर्मा हा आयपीएलमधील पहिला खेळाडू आहे ज्याने 40 ते 50 धावांमध्ये 20 वेळा विकेट गमावली आहे. त्याने 20 वेळा 40 धावांचा टप्पा ओलांडला आहे, पण त्याला अर्धशतक करता आले नाही.
यंदा अजून एकही अर्धशतक नाही
रोहित शर्मा आयपीएल 2024 मध्ये एकही अर्धशतकी खेळी खेळू शकला नाही. तो अर्धशतक करु शकला नाही तरी त्याचा स्ट्राइक रेट चांगला आहे. या हंगामात त्याने 4 सामन्यात 171 च्या स्ट्राईक रेटने 118 धावा केल्या आहेत. तसेच आयपीएल 2024 त्याची सर्वोच्च धावसंख्या 49 आहे. ही धावसंख्या त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात केली आहे. तसेच रोहितने टी20 क्रिकेटमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एकूण 6 चौकारांसह 1505 चौकार पूर्ण केले आहेत. या फॉरमॅटमध्ये 1500 हून अधिक चौकार मारणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
