CSK vs RCB | अनुज रावतची झंझावाती खेळी, सीएसकेला 174 धावांचं आव्हान

| Updated on: Mar 22, 2024 | 10:34 PM

IPL 2024 CSK vs RCB 1st Innings Highlights In Marathi | आरसीबीने जोरदार कमबॅक करत चेन्नईला 174 धावांचं आव्हान दिलं आहे.

CSK vs RCB | अनुज रावतची झंझावाती खेळी, सीएसकेला 174 धावांचं आव्हान
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्सला विजयसााठी 174 धावांचं आव्हान दिलं आहे. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 173 धावा केल्या. आरसीबीकडून अनुज रावत याने सर्वाधिक 48 धावा केल्या. त्याला अनुभवी दिनेश कार्तिक याने चांगली साथ दिली. तर कॅप्टन फाफ डु प्लेसिस याने 35 रन्सचं योगदान दिलं. कॅमरुन ग्रीन याने 18 धावा जोडल्या. तर इतर फलंदाज अपयशी ठरले. तसेच चेन्नई सुपर किंग्सकडून मुस्तफिजुर रहमान याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

आरसीबीची बॅटिंग

आरसीबीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कॅप्टन फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली सलामी जोडी मैदानात आली. फाफने वाजळी खेळी करत पावरप्लेचा चांगला फायदा घेतला आणि आरसीबीला अपेक्षित सुरुवात करुन दिली. मात्र आश्वासक सुरुवातीनंतर आरसीबीला झटपट 2 झटके लागले. फाफ 35 धावावंर आऊट झाला. त्याच ओव्हरमध्ये रजत पाटीदार झिरोवर ढेर झाला. मुस्तफिजुर रहमान याने या 2 विकेट्स घेत आरसीबाच्या धावांना ब्रेक लावला.

त्यानंतर पुढील ओव्हरमध्येच ग्लेन मॅक्सवेल झिरोवर आऊट झाला. त्यानंतर विराट आणि कॅमरुन या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र यात दोघांनाही फार काही यश आलं नाही. आरसीबीने 12 व्या ओव्हरमध्येच 2 विकेट्स गमावल्या. विराट 21 धावा करुन माघारी परतला. तर कॅमरुन ग्रीन याने 18 धावा जोडल्या. त्यामुळे आरसीबीची स्थिती 11.4 ओव्हरमध्ये 5 बाद 78 अशी झाली.

अनुज-कार्तिकची निर्णायक भागीदारी

आरसीबीला दिनेश कार्तिक आणि अनुज रावत या जोडीने अडचणीतून बाहेर काढलं. हे दोघे अखेरच्या बॉलपर्यंत लढले. आरसीबीला या दोघांनी केलेल्या खेळीमुळे सीएसकेसमोर सन्मानजनक आव्हान ठेवता आलं. या दोघांनी 50 बॉलमध्ये 95 धावांची भागीदारी केली. अनुजने 4 चौकार आणि 3 सिक्ससह 48 धावा केल्या. अनुज शेवटच्या बॉलवर रन आऊट झाला. तर दिनेश कार्तिक 26 बॉलमध्ये 3 चौकार आणि 2 सिक्सह 38 धावांवर नाबाद परतला.

आरसीबीचं जोरदार कमबॅक

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, महेश तीक्षना, मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग इलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरुन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर आणि मोहम्मद सिराज.