IPL 2024 RR vs MI Live Streaming : मुंबईसमोर राजस्थानचं आव्हान, कोण जिंकणार?

Rajasthan Royals vs Mumbai Indians Live Streaming : मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या 17 व्या मोसमातील आव्हान कायम ठेवायचं असेल तर राजस्थान विरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे.

IPL 2024 RR vs MI Live Streaming : मुंबईसमोर राजस्थानचं आव्हान, कोण जिंकणार?
MI AND RR
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 21, 2024 | 4:31 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 38 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना रंगणार आहे. संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे मुंबई इंडियन्सची धुरा आहे. राजस्थान आणि मुंबईचा हा या हंगामातील आठवा सामना आहे. राजस्थानने 7 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तर मुंबईने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत. राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी मुंबईसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर राजस्थान हा सामना जिंकून प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

राजस्थान विरुद्ध मुंबई सामना केव्हा?

राजस्थान विरुद्ध मुंबई यांच्यातील सामना 22 एप्रिल रोजी होणार आहे.

राजस्थान विरुद्ध मुंबई सामना कुठे?

राजस्थान विरुद्ध मुंबई यांच्यातील सामना जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये होणार आहे.

राजस्थान विरुद्ध मुंबई सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

राजस्थान विरुद्ध मुंबई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

राजस्थान विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

राजस्थान विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

राजस्थान विरुद्ध मुंबई सामना मोबाईलवर फुकटात कुठे पाहायला मिळेल?

राजस्थान विरुद्ध मुंबई सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर मोफत पाहायला मिळेल.

राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोव्हमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, रविचंद्रन अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर , युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पीयुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.