
आयपीएल स्पर्धेत जेतेपद मिळवण्याचं सनरायझर्स हैदराबादचं स्वप्न भंगलं. साखळी फेरीत आक्रमक फलंदाजीमुळे चर्चेत असलेल्या हैदराबादकडून अंतिम फेरीत चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला खरा पण तेथून पुढे सर्व विरोधात गेलं. कोलकात्याच्या मिचेल स्टार्कने पहिल्या षटकापासूनच हैदराबादला बॅकफूटवर ढकललं. इतकंच काय तर हेड घाबरून स्ट्राईकला आला नाही. त्यामुळे हैदराबादवर स्टार्कचा किती दबाव होता हे स्पष्ट झालं. सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू टप्प्याटप्प्याने बाद होत तंबूत परतत होते. त्यामुळे हैदराबादच्या चाहत्यांना पराभव पहिल्याच डावात स्पष्ट दिसत होता. कोलकाता नाईट रायझर्सने हैदराबादला डोकंच वर काढू दिलं नाही. सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण 18.3 षटकात सर्वबाद 113 धावा करू शकला आणि विजयासाठी 114 धावांचं सोपं आव्हान दिलं. हे आव्हान कोलकात्याने 2 गडी गमवून 10.3 षटकात पूर्ण केलं. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे.
पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादच्या मालकीन काव्या मारन यांना या वेदना सहन झाल्या नाहीत. त्यांनी सामन्यानंतर खेळाडूंचं टाळ्या वाजून स्वागत केलं. पण त्यांच्या डोळ्यातील अश्रू स्पष्ट दिसत होते. एकवेळ त्यांना हे अश्रू अनावर झाले. त्यांनी कॅमेऱ्याला पाठ दाखवून डोळे पुसले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांना अशा स्थितीत पाहून नेटकरीही अस्वस्थ झाले आहेत.
Kavya maran is Crying 😭
She Deserve better ❤️💜#KKRvsSRH #IPLfinale #KavyaMaran #akiba #monacoGP pic.twitter.com/mPl3sC6cA3— SHAH RUKH KHAN FC INDIA (@SRK_FC_INDIA) May 26, 2024
I'm a KKR fan. I'm Happy for KKR but #KavyaMaran 😭😭💔 https://t.co/fVCTz6OYJH
— Tʜᴇ BʟᴀᴄᴋʟɪsᴛᴇD SᴏᴜL (@BlacklistedPOV) May 26, 2024
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
कोलकाता नाईट रायडर्स इम्पॅक्ट प्लेयर्स: अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफेन रदरफोर्ड
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.
सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेयर्स: उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर