IPL 2024 | ‘…म्हणून हार्दिक पंड्याला कॅप्टन केलं’; अखेर मुंबई इंडियन्सकडून स्पष्टीकरण

| Updated on: Dec 15, 2023 | 10:23 PM

MI New Captain Hardik Pandya : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची हार्दिक पंड्या याला लॉटरी लागली आहे. मात्र रोहितचे चाहते नाराज झाले आहेत, MI ने इतका मोठा आणि निर्दयी निर्णय कसा घेतला, असा सवाल चाहेत करतायेत. अशातच मुंबई इंडियन्सने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

IPL 2024 | ...म्हणून हार्दिक पंड्याला कॅप्टन केलं; अखेर मुंबई इंडियन्सकडून स्पष्टीकरण
Follow us on

मुंबई : आयपीएल 2024 मधील सर्वाधिक यशस्वी असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने सर्वांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा याला हटवत हार्दिक पंड्या याची कर्णधारपदाची निवड केली आहे. टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयावर मुंबईतच्या चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे. रोहित यंदा शेवटचा सीझन खेळून निवृत्ती जाहीर करेल असं सर्वांना वाटलं होतं. मात्र पंड्या कॅप्टन म्हणूनच संघात परतला होता हे आता सिद्ध झालं आहे. अशातच यावर मुंबई इंडियन्सचे ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स माहेला जयवर्धने यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

काय म्हणाला माहेला जयवर्धने?

मुंबई इंडियन्स टीम मॅनेजमेंटने भविष्याचा विचार करत हा निर्णय घेतला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, रिकी पाँटिंग यांच्यापासून रोहित शर्माने मुंबई संघाचं नेतृत्त्व केलं आहे. संघाला यश मिळवून देण्यासोबतच भविष्यातील संघ कसा बळकट राहिल यासाठीसुद्धा महत्त्वाचं योगदान दिलं आहे. याच कारणामुळे हार्दिक पंड्या याची नवीन कर्णधार म्हणून निवड केली असल्याचं माहेला जयवर्धने सांगितलं आहे.

रोहित शर्माने केलेल्या कॅप्टन्सीबद्दल त्याचे आभार व्यक्त करतो. 2013 साली मुंबईच्या नेतृत्त्वाची धुरा त्याने स्वीकारला होती. तेव्हापासून रोहितने संघाला फक्त यशच नाही मिळवून दिलं तर आयपीएलच्या इतिहासातील बेस्ट कॅप्टनमध्ये त्याचा समावेश झाला आहे. रोहितच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स तगडा संघ बनला आणि भविष्यातही आणखी तगडा करण्यासाठी आम्ही त्याच्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहेत. हार्दिकला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असं जयवर्धेने म्हटलं आहे.

दरम्यान, हार्दिकल पंंड्याला मुंबईने ट्रेड केलं त्यावेळी जसप्रीत बुमराह याची एक पोस्ट चर्चेत आली होती.  क्रिकेट चाहत्यांनी या पोस्टचा धागा पकडत बुमराहने आधीच पुसटशी कल्पना दिली असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे. चाहते या निर्णयामुळे नाराज झालेले दिसत आहेत कारण मुंबईच्या कमेंट बॉक्समध्ये नाराज असल्याचं जाहीरपणे ते सांगत आहेत.