IPL 2025 Closing Ceremony: कुठे आणि कधी पाहता येईल आयपीएल क्लोजिंग सेरेमनी, जाणून घ्या सर्वकाही

IPL 2025 Closing Ceremony, Date, Live Streaming: आयपीएल स्पर्धा गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. 3 जूनला अंतिम सामना असून या सामन्यापूर्वी सांगता कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात शंकर महादेवनसह इतर कलाकार परफॉर्म करताना दिसणार आहे.

IPL 2025 Closing Ceremony: कुठे आणि कधी पाहता येईल आयपीएल क्लोजिंग सेरेमनी, जाणून घ्या सर्वकाही
आयपीएल क्लोजिंग सेरेमनी
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Jun 02, 2025 | 8:51 PM

आयपीएल 2025 स्पर्धेचा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. 3 जूनला हा सामना पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी आयपीएल 2025 स्पर्धेची क्लोजिंग सेरेमनी पार पडणार आहे. या क्लोजिंग सेरेमनीची थीम ऑपरेशन सिंदूरवर आधारित आहे. या कार्यक्रमावेळी संपूर् स्टेडियममध्ये तिरंग्याची रोषणाई दिसणार आहे. या कार्यक्रमात गायक शंकर महादेवन उपस्थित राहणार आहे. बीसीसीआयने या क्लोजिंग सेरेमनीसाठी तिन्ही दलाच्या प्रमुखांना आमंत्रित केलं होतं. पण काही कारणास्तव त्यांना या कार्यक्रमाला हजर राहता येणार नाही. आयपीएल 2025 स्पर्धा भारत पाकिस्तान तणामुळे एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. या दरम्यान भारताने पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. त्यामुळे पाकिस्तान भारतापुढे गयावया केल्या आणि ऑपरेशन सिंदूर काही काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. त्यानंतर बीसीसीआयने नव्याने वेळापत्रक जाहीर केलं. यापूर्वी आयपीएलचा अंतिम सामना 25 मे रोजी होणार होता. पण वेळापत्रकातील बदललं आणि हा सामना 3 जूनला होणार आहे.

कुठे आणि कधी होणार क्लोजिंग सेरेमनी?

आयपीएल 2025 स्पर्धेची क्लोजिंग सेरेमनी 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. दोन्ही संघाच्या चाहत्यांनी मैदान खचाखच भरणार यात काही शंका नाही. या सामन्यासाठी सर्वाधिक आरसीबीचे चाहते उत्सुक आहेत.

कोण करणार परफॉर्म?

आयपीएल क्लोजिंग सेरेमनीत शंकर महादेवन परफॉर्म करणार आहे. क्लोजिंग सेरेमनीत ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या सैनिकांना आपल्या गाण्यातून सन्मानित करतील.

कुठे पाहता येईल क्लोजिंग सेरेमनी?

आयपीएल क्लोजिंग सेरेमनी लाईव्ह स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि मोबाईलवर जियो हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

किती वाजता सुरु होईल क्लोजिंग सेरेमनी?

आयपीएल क्लोजिंग सेरेमनी नाणेफेकीचा एक तास आधी सुरु होईल. आयपीएलनुसार क्लोजिंग सेरेमनी संध्याकाळी 6 वाजता सुरु होईल.पाऊस आणि इतर काही गोष्टी पाहता कार्यक्रमात ऐनवेळी बदल होऊ शकतो.