
आयपीएलच्या 18 व्या मोसामातील 62 व्या सामन्यात प्लेऑफमधून बाहेर झालेले 2 संघ आमनेसामने आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात हा सामना होणार आहे. महेंद्रसिंह धोनी याच्याकडे चेन्नईच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर संजू सॅमसन राजस्थानचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याचं आयोजन हे नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.त्याआधी 7 वाजता टॉस झाला. राजस्थानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. संजू सॅमसन याने फिल्डिंगचा निर्णय घेत चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
राजस्थान रॉयल्सने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केला आहे. वेगवान गोलंदाज युद्धवीर सिंह याचं कमबॅक झालं आहे. कर्णधार संजू सॅमसन याने टॉस दरम्यान याबाबतची माहिती दिली. राजस्थानचा हा या मोसमातील 14 वा आणि शेवटचा सामना आहे. राजस्थानने याआधी 13 पैकी फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे राजस्थानचा या सामन्यात चेन्नईवर मात करत मोसमाचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे.
चेन्नईचा हा हंगामातील 13 वा सामना आहे. चेन्नईला याआधी 12 पैकी 3 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे चेन्नईचाही या सामन्यात विजय मिळवून पॉइंट्स टेबलमधील स्थिती सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे.चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानी आहे.
दरम्यान चेन्नई विरुद्ध राजस्थान दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दोन्ही संघ 30 मार्चला आमनेसामने होते. तेव्हा राजस्थानने चेन्नईवर 6 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता चेन्नई या सामन्यात गेल्या पराभवाची परतफेड करावी, अशी अपेक्षा यलो आर्मीच्या चाहत्यांची आहे. त्यामुळे यात चेन्नईला किती यश येतं? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन: आयुष म्हात्रे, डेव्हॉन कॉनवे, उर्विल पटेल, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, एमएस धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), अंशुल कंबोज, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, खलील अहमद
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, क्वेना माफाका, युद्धवीर सिंग चरक, तुषार देशपांडे आणि आकाश मधवाल.