
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 32 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे दिल्लीच्या होम ग्राउंड अर्थात अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. राजस्थान रॉयल्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार संजू सॅमसन याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत दिल्ली कॅपिट्ल्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता दिल्ली घरच्या मैदानात किती धावा करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
राजस्थान आणि दिल्ली या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. टीम मॅनेजमेंटने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवत प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे आता या खेळाडूंवर टीम मॅनेजमेंटचा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी असणार आहे.
दिल्लीचा हा या मोसमातील सहावा तर राजस्थानचा सातवा सामना आहे. दिल्लीने सलग 4 सामने जिंकले. त्यानंतर दिल्लीला पाचव्या सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये 8 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर राजस्थानला 6 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहे. त्यामुळे राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. राजस्थानलाही गेल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे दिल्ली आणि राजस्थान दोन्ही संघांचा हा सामना जिंकून कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे. अशात आता कोण यशस्वी ठरणार? हे काही तासांनी स्पष्ट होईल.
राजस्थान टॉसचा बॉस
🚨 Toss 🚨@rajasthanroyals won the toss and elected to bowl against @DelhiCapitals in Match 32.
Updates ▶ https://t.co/clW1BIPA0l#TATAIPL | #DCvRR pic.twitter.com/SSsD99s8dN
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2025
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, नितीश राणा, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव आणि मोहित शर्मा.