IPL 2025 : गुजरात टायटन्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, शुबमन गिल गोलंदाजी घेत दिली गूड न्यूज

आयपीएल 2025 स्पर्धेतील 35वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांची शर्यत सुरु आहे. विजयानंतर प्लेऑफमधील स्थान पक्कं होण्याच्या दृष्टीने एक पाऊल असेल. दरम्यान, नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने लागला.

IPL 2025 : गुजरात टायटन्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, शुबमन गिल गोलंदाजी घेत दिली गूड न्यूज
शुबमन गिल
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 19, 2025 | 3:20 PM

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 35 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आले आहेत. नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. खूप गरम आहे. खेळपट्टी खूप चांगली दिसते. जर तुम्ही जास्त गवत ठेवले नाही तर ते फुटेल. गोष्टी चांगल्या चालल्या आहेत. आपण भूतकाळाबद्दल जास्त विचार करत नाही. हे दिवस परत आणण्याबद्दल आहे. संघाला स्पर्धेत येण्यासाठी काही आठवडे लागतात. आम्ही त्याच संघासह जात आहोत. आशा आहे की, रबाडा दहा दिवसांत परत येईल.’ शुबमन गिलने रबाडा परत येणार असल्याचे सांगितल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कारण दुसऱ्या टप्प्यात गुजरातच्या गोलंदाजीची धार आणखी वाढणार आहे. त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल.

अक्षर पटेल म्हणाला की, ‘मलाही क्षेत्ररक्षण करायचे होते. खूप उष्णतेमुळे मी गोंधळलो होतो. हवामानामुळे मी थोडासा संशयी होतो. गोलंदाज उन्हात थकू शकतात. आम्हाला चांगले धावा करण्याचा आणि बचाव करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आम्हाला चांगली सुरुवात हवी होती. आम्हाला प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करायचे होते. आम्ही आमच्या प्रक्रियेवर आणि अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही सुधारणांबद्दल बोलत राहतो. ड्रेसिंग रूमचे वातावरण चांगले राहिले आहे. तुमच्या कल्पनांमध्ये स्पष्ट असणे महत्त्वाचे आहे. आम्ही त्यांना स्पष्ट भूमिका दिल्या आहेत. तुम्हाला कधीकधी यश मिळू शकते आणि कधीकधी तुम्हाला ते मिळणार नाही.’

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ 5 वेळा आमनेसामने आले आहेत. यावेळी गुजरातने दोन तर दिल्ली कॅपटिल्सने तीन सामन्यात विजय मिळवला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दोन वेळा भिडले आहेत. यात दोन्ही वेळेस दिल्लीने बाजी मारली आहे. तर गुजरातने या मैदानावर 19 सामने खेळले आहेत. त्यापैकी 11 सामन्यात विजय, तर 8 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा.