AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : गुजरात टायटन्सने आयपीएल स्पर्धेत रचला इतिहास, यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं

आयपीएल 2025 स्पर्धेत गुजरात टायटन्स संघ प्लेऑफच्या वेशीवर आहे. यावेळी सात संघात प्लेऑफसाठी चुरस आहे. पण गुजरात टायटन्स टॉप 4 मध्ये असं दिसत आहे. उर्वरित तीन पैकी एका सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफचं स्थान पक्कं होणार आहे. असं असताना गुजरात टायटन्सने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

IPL 2025 : गुजरात टायटन्सने आयपीएल स्पर्धेत रचला इतिहास, यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं
शुबमन गिलImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 15, 2025 | 7:33 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेची रंगत आता शिगेला पोहोचली आहे. 17 मे पासून आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या प्लेऑफमध्ये एकही संघ अजून निश्चित झाला नाही. चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ बाद झाले आहेत. तर इतर सात संघात प्लेऑफसाठी जोरदार चुरस आहे. गुजरात टायटन्सने 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे, तर तीन सामने शिल्लक आहेत. गुजरात टायटन्सचे 16 गुण आणि नेट रनरेट +0.793 आहे. तीन पैकी एका सामन्यात विजय मिळवताच प्लेऑफचं स्थान पक्कं होणार आहे. असं असताना गुजरात टायटन्सच्या तीन फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. आघाडीच्या तीन फलंदाजांनी नवं विक्रम प्रस्थापित केलं आहे. मागच्या 17 पर्वात असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. आघाडीला फलंदाजी करणाऱ्या शुबमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलरने ही कामगिरी केली आहे.

कर्णधार शुबमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी एकाच पर्वात 500 हून अधिक धावा करण्याची किमया साधली आहे. अनेकदा आघाडीच्या दोन फलंदाजांनी 500 हून अधिक धावा केल्या आहेत. पण पहिल्यांदाच आघाडीच्या तीन फलंदाजांनी 500 पार आकडा गाठला आहे. इतकंच काय तर आयपीएल 2025 सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप 5 मध्ये आहेत. त्यामुळे तिन्ही खेळाडू ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहेत. साई सुदर्शनने 11 सामन्यात 46.27 च्या सरासरीने आणि 153.31 च्या स्ट्राईक रेटने 509 धावा केल्या आहेत.

शुबमन गिलने 11 सामन्यात 50.80 च्या सरासरीने आणि 152.55 च्या स्ट्राईक रेटने 508 धावा केल्या आहेत. तर जोस बटलरने 11 सामन्यात 71.43 च्या सरासरीने 163.93 स्ट्राईक रेटने 500 धावा केल्या आहेत. जोस बटलर प्लेऑफचे सामने खेळणार नसल्याचं आधीच स्पष्ट झालं आहे. त्याच्या जागी असलंका मेंडिसची निवड झाली आहे. म्हणजेच पुढच्या तीन सामन्यात जोस बटलर खेळेल. त्यानंतर मायदेशी परतेल. वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेसाठी जोस बटलरची निवड झाली आहे.

Follow Us
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...