
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 39 व्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स भिडणार आहेत. गुजरात आणि केकेआर या दोन्ही संघांचा हा या मोसमातील आठवा सामना असणार आहे. अजिंक्य रहाणे केकेआरचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरातच्या कर्णधारपदाची धुरा आहे. गुजरात या मोसमात आतापर्यंत सध्या धमाकेदार कामगिरी करत आहे. तर केकेआरला सातत्य राखण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे केकेआरचा घरच्या मैदानातून पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला गुजरातला विजयी घोडदौड कायम राखायची असेल तर त्यांना केकेआरचा गड भेदावा लागेल.
ताज्या आकडेवारीनुसार, गुजरात टायटन्स पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. गुजरातने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर गुजरातला फक्त 2 सामन्यात अपयश आलं आहे. गुजरातचा नेट रनरेट हा +0.984 असा आहे. तर केकेआरला 7 पैकी फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत. केकेआरने 4 सामने गमावले आहेत. केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये +0.547 नेट रनरेटसह सहाव्या क्रमांकावर विराजमान आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना सोमवारी 21 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना ईडन गार्डन्स, कोलकाता येथे आयोजित करण्यात आला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल
दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आतापर्यंत एकूण 4 सामने खेळवण्यात आले आहेत. गुजरातने या 4 पैकी 2 सामन्यांमध्ये केकेआरवर मात केली आहे. तर केकेआरला एकच सामना जिंकता आला आहे. तर उभयसंघातील 1 सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला.