IPL 2025, KKR vs PBKS : कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने, कोणाचं पारडं जड?

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 12व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. कोलकात्याने या स्पर्धेतील दोन्ही सामने गमावले आहेत. तर पंजाबची विजयी गाडी धावत आहे. चला जाणून घेऊयात कोणाचं पारडं जड ते...

IPL 2025, KKR vs PBKS : कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने, कोणाचं पारडं जड?
IPL 2025, KKR vs PBKS : कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने, कोणाचं पारडं जड?
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 05, 2026 | 10:32 PM

आयपीएल 2026 स्पर्धेची रंगत आता हळूहळू वाढताना दिसत आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. सध्या गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांची स्थिती नाजूक आहे. तर राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि आरसीबी हे संघ फॉर्मात आहे. असं असताना आयपीएल स्पर्धेच्या 12व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. तसं पाहिलं तर या सामन्यात पंजाब किंग्सची बाजू वरचढ दिसत आहे. कारण आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सला दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तसेच पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघावर विजयाचं दडपण असणार आहे. हा सामना कोलकात्याचं होमग्राउंड असलेल्या ईडन गार्डन्सवर होणार आहे.

हेड टू हेड आकडेवारी

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही संग 25वेळा भिडले आहेत. यात कोलकाता नाईट रायडर्सचं पारडं जड मानलं जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सने 21 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पंजाब किंग्सने 13 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. त्यामुळे आकडेवारीत तरी कोलकाता नाईट रायडर्स संघ मजबूत दिसत आहे. पण या स्पर्धेतील स्थिती पाहता या रेकॉर्डवर विजयाचं गणित बांधणं चुकीचं ठरेल. कोलकात्याने पंजाबविरुद्ध सर्वाधिक 261 धावा, तर पंजाबने कोलकात्याविरुद्ध सर्वाधिक 262 धावा केल्या आहेत. सर्वात कमी स्कोअरबाबत बोलायचं तर कोलकात्याने 79 आणि पंजाबने 111 धावांची नोंद केली आहे.

नाणेफेकीचा कौल

कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत 19 वेळा, तर पंजाब किंग्सने 16 वेळा नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. यात कोलकात्याने नाणेफेक जिंकल्यानंतर 4 वेळा बॅटिंग आणि 15 वेळा फिल्डिंग निवडली आहे. तर पंजाब किंग्सने 8 वेळा बॅटिंग आणि 8 वेळा फिल्डिंगला पसंती दिली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर कोलकात्याने 12 वेळा सामना जिंकला आहे. तर पांजाब किंग्सने 6 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून कोलकात्याची विजयी टक्केवारी अधिक आहे.

Follow Us