
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 26 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. ऋषभ पंत याच्याकडे लखनौचं तर शुबमन गिलकडे गुजरातचं कर्णधारपद आहे. सामन्याचं आयोजन हे भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. होम टीम लखनौच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार ऋषभ पंतने फिल्डिंगचा निर्णय घेत पाहुण्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे.
लखनौ आणि गुजरात दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. लखनौला नाईलाजाने बदल करावा लागला आहे. लखनौचा मॅचविनर ऑलराउंडर मिचेल मार्श याला वैयक्तिक कारणामुळे माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे मिचेलच्या जागी हिम्मत सिंग याचा समावेश करण्यात आला आहे. तर कुलवंत खेजरोलिया याच्या जागी ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान लखनौ आणि गुजरात या दोन्ही संघांचा हा या मोसमातील प्रत्येकी सहावा सामना आहे. गुजरातने या मोसमात जबरदस्त कामगिरी केली आहे. लखनौची या मोहिमेतील सुरुवात पराभवाने झाली. मात्र त्यानंतर गुजरातने दणक्यात कमबॅक करत सलग 4 सामने जिंकले. तर लखनौनेही समाधानकारक कामगिरी केली आहे. लखनौने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. लखनौने मागील दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे लखनौकडे हा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तर गुजरातकडे विजयी पंच लगावण्याची संधी आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघात चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
भारताचे 2 युवा कर्णधार आमनेसामने
A 𝘽𝙡𝙤𝙘𝙠𝙗𝙪𝙨𝙩𝙚𝙧 day is upon us 🍿
And we’re getting started with the #LSGvGT clash 🔥
Updates ▶ https://t.co/VILHBLEerV #TATAIPL | @LucknowIPL | @gujarat_titans pic.twitter.com/V7y5WGVNPw
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), हिम्मत सिंग, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान आणि रवी बिश्नोई.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुधारसन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर आणि मोहम्मद सिराज.