
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 61 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. ऋषभ पंत याच्याकडे लखनौच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर पॅट कमिन्स हैदराबादच्या नेतृत्वाची सूत्र सांभाळणार आहे.या सामन्याचं आयोजन हे भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी स्टेडियम, लखनौ येथे करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. हैदराबादने टॉस जिंकला. पॅट कमिन्सने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता लखनौ हैदराबादसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
प्लेऑफसाठी गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या 3 सघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता एका जागेसाठी 3 संघांमध्ये चुरस आहे. लखनौ टीम प्लेऑफच्या शर्यतीत आहे. तर हैदराबादचं या स्पर्धेतून पॅकअप झालंय. त्यामुळे हैदराबादकडे गमावण्यासाठी काहीच नाही. मात्र लखनौसाठी हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे लखनौला या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. तर हैदराबाद विजय मिळवून लखनौचा गेम करणार का? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
हैदराबादला या सामन्यात नाईलाजाने 2 बदल करावे लागले आहेत. हैदराबादचा विस्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड याला कोरोना झाला आहे. तर वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याने वैयक्तिक कारणामुळे या सामन्यातून माघार घेतली आहे. त्यामुळे विदर्भाच्या हर्ष दुबे याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. तर अथर्व तायडेला संधी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला विलियम ओ रुर्क याने लखनौकडून पदार्पण केलं आहे.
हैदराबादने टॉस जिंकला
🚨 Toss 🚨@SunRisers won the toss and elected to bowl against @LucknowIPL in Match 6⃣1⃣
Updates ▶️ https://t.co/GNnZh90u7T#TATAIPL | #LSGvSRH pic.twitter.com/upINWS6jsc
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2025
दरम्यान लखनौ आणि हैदराबाद दोन्ही संघांचा हा या मोसमातील प्रत्येकी 12-12 वा सामना आहे. लखनौने 11 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादला 11 पैकी फक्त 3 वेळा यश मिळालं आहे. लखनौ पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या तर हैदराबाद आठव्या स्थानी आहे.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श, एडन मार्करम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), आयुष बडोनी, अब्दुल समद, आकाश दीप, आवेश खान, रवी बिश्नोई, दिग्वेश सिंग राठी आणि विल्यम ओर्रुके.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकपर), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, कामिंडू मेंडिस, पॅट कमिन्स (कॅप्टन), हर्षल पटेल, हर्ष दुबे, झीशान अन्सारी आणि एशान मलिंगा.