IPL 2025 MI : 23 मार्चला मुंबईचा पहिलाच सामना CSK विरुद्ध, पाहा पलटणचं वेळापत्रक
IPL 2025 Mumbai Indians Full Schedule : मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 18 व्या मोसमातीलतिसऱ्याच सामन्यात चेन्नईविरुद्ध भिडणार आहे. जाणून घ्या पलटणचं संपूर्ण वेळापत्रक.

बीसीसीआयने रविवारी 16 फेब्रुवारीला आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं (IPL 2025) वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, 13 शहरांमध्ये 65 दिवस 74 सामन्यांचा थरार रंगणार आहे. एकूण 10 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. तसेच यंदा 12 डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहेत. या हंगामातील सलामीच्या सामन्यात गतविजेता कोलकाता विरुद्ध बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. तर 23 फेब्रुवारीला आयपीएलमधील 2 यशस्वी संघ आमेनसामने भिडणार आहेत. मुंबई विरुद्ध चेन्नई हे दोघे एकमेकांविरूद्धच्या सामन्याने या हंगामातील मोहिमेला सुरुवात करणार आहेत. या निमित्ताने आपण मुंबईच्या सामन्यांचं वेळापत्रक जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स या 18 व्या हंगामात 5 संघांविरुद्ध प्रत्येकी 2 सामने खेळणार आहे. तर पलटणला इतर 4 संघांविरुद्ध 1 सामना खेळायचा आहे. पलटण चेन्नई, हैदराबाद, गुजरात दिल्ली आणि लखनऊविरुद्ध प्रत्येकी 2 सामने खेळणार आहे. तर यंदा राजस्थान, पंजाब, बंगळुरु आणि कोलकाताविरुद्ध प्रत्येकी 1 सामना होणार आहे. पलटण एकूण 14 पैकी 7 सामने घरच्या मैदानात तर इतर 7 सामने प्रतिस्पर्धी संघाच्या होम ग्राउंडमध्ये खेळणार आहे.
5 रिटेन, 1 आरटीएम आणि 17 खरेदी
दरम्यान पलटणने मेगा ऑक्शनआधी एकूण 5 खेळाडू रिटेन केले होते. तर त्यानंतर मेगा ऑक्शनमधून 1 खेळाडू आरटीएमद्वारे आपल्या गोटात घेतला. तर 17 नवे खेळाडूंना ऑक्शनमधून खरेदी केलं.
पलटणचं वेळापत्रक, जाणून घ्या
𝑵𝒂𝒈𝒂𝒓 𝒎𝒆𝒊𝒏 𝒅𝒉𝒊𝒏𝒅𝒐𝒓𝒂 𝒑𝒊𝒕𝒘𝒂 𝒅𝒐, 𝒎𝒂𝒎𝒂 🗣
🗓 𝗧𝗮𝘁𝗮 𝗜𝗣𝗟 𝟮𝟬𝟮𝟱 schedule aa gaya hai! #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL pic.twitter.com/HoBuM6a8UT
— Mumbai Indians (@mipaltan) February 16, 2025
रिटेन खेळाडू आणि किंमत : जसप्रीत बुमराह (18 कोटी), हार्दिक पंड्या (16.35 कोटी), सूर्यकुमार यादव (16.35 कोटी), रोहित शर्मा (16.30 कोटी) आणि तिलक वर्मा (8 कोटी)
आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमधून घेतलेले खेळाडू : ट्रेन्ट बोल्ट (12.5 कोटी), दीपक चाहर (9.25 कोटी), विल जॅक्स : (5.25 कोटी), नमन धीर 5.25 कोटी (RTM), मुजीब उर रहमान (दुखापतग्रस्त अल्लाह गजनफर याच्या जागी समावेश), मिचेल सँटनर (2 कोटी), रायन रिकल्टन (1 कोटी), लिज्जाड विलियम्स (75 लाख), रीस टॉप्ली (75 लाख), रॉबिन मिंझ : (65 लाख), कर्ण शर्मा (50 लाख), विग्नेश पुथुर (30 लाख), अर्जुन तेंडुलकर (30 लाख), बेवन जॅकब्स (30 लाख), वी. सत्यनारायण (30 लाख), राज अंगद बावा (30 लाख), केएल श्रीजीत (30 लाख) आणि अश्वनी कुमार (30 लाख)
