रोहित शर्माने जे काही बोलला, ते मोहम्मद सिराजने करून दाखवलं, हिटमॅनच्या दांड्या उडवल्या Video

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजचं द्वंद्व पाहण्याची उत्सुकता होती. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीत नाकारल्यानंतर बरंच काही घडलं होतं. मोहम्मद सिराजने रोहित शर्माचे शब्द खरे करून दाखवले.

रोहित शर्माने जे काही बोलला, ते मोहम्मद सिराजने करून दाखवलं, हिटमॅनच्या दांड्या उडवल्या Video
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 29, 2025 | 11:02 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतून टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी अनेक खेळाडू धडपड करत आहेत. त्यामुळे आयपीएल हा मोठा मार्ग आहे. त्यामुळे अनेक खेळाडू या माध्यमातून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यात मोहम्मद सिराजचं नाव देखील आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मोहम्मद सिराजला टीम इंडियात जागा मिळाली नाही. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीतूनही डावललं गेलं. कर्णधार रोहित शर्माने त्याला डावलण्याचं कारण सांगितलं होतं. मोहम्मद सिराजने रोहित शर्माने जे काही सांगितलं ते सिद्ध करून दाखवलं. ते देखील रोहित शर्माचा त्रिफळा उडवून.. आयपीएलच्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आले. या सामन्यात सर्वांना उत्सुकता होती ती रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीच्या द्वंद्वाची.. कारण रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघात मोहम्मद सिराजला टीम इंडियात जागा मिळाली नव्हती. तेव्हा रोहित शर्माने सांगितलं होतं की, सिराज नव्या चेंडूने पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्यात सक्षम आहे. पण टीममध्ये आधीच मोहम्मद शमी होता. तेव्हा रोहित शर्माने सांगितलं की, सिराज चेंडू जुना झाला की तितका प्रभावी ठरत नाही.

आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मोहम्मद सिराज रोहित शर्माचं हे म्हणणं फेटाळलं होतं. तसेच जुन्या चेंडूनेही गोलंदाजी करतो असं सांगितलं होतं. त्यामुळे मोहम्मद सिराज टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासमोर कशी गोलंदाजी करतो याची उत्सुकता होती. सिराजने रोहित शर्माचं म्हणणं खरं करून दाखवलं. नव्या चेंडूने प्रभावी ठरत असल्याचं दाखावून दिलं. मुंबई इंडियन्सची बॅटिंगवेळी रोहित शर्माने मोहम्मद सिराजला सलग दोन चौकार मारले. पण त्यानंतरच्या चेंडूवर रोहितचा त्रिफळा उडवला. सिराजने रोहितने सांगितलेली गोष्ट त्याच्यासमोर खरी करून दाखवलं.

सिराजने चौथा चेंडू टाकला आणि टप्पा पडताच आत घुसला. रोहित शर्माला काही कळायच्या आत स्टंप घेऊन गेला. रोहित शर्मा विकेट गेल्यानंतर चेंडूच्या टप्प्याकडे आणि स्टंपकडे पाहात राहिला आणि त्यानंतर तंबूत परतला. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सलग दुसऱ्या सामन्यात फेल गेला. रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खातं न खोलता बाद झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात 4 चेंडूत 8 धावा करून बाद झाला.