
रायन रिकेल्टन आणि लोकल बॉय सूर्यकुमार यादव या जोडीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्ससमोर 216 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 215 धावा केल्या. मुंबईकडून सूर्या आणि रायन या दोघांव्यतिरिक्त रोहित शर्मा, विल जॅक्स, कॉर्बिन बॉश आणि नमन धीर या चौकडीनेही योगदान दिलं. नमनने अखेरच्या क्षणी केलेल्या नाबाद खेळी केली. त्यामुळे मुंबईला 200 पार मजल मारता आली. मुंबईच्या फलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडल्यानंतर आता गोलंदाजांवर सर्व जबाबदारी असणार आहे. त्यामुळे पलटण आता वानखेडेत लखनौचा धुव्वा उडवून गेल्या पराभवाचा वचपा काढणार की नाही? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
मुंबईसाठी ओपनर रायन रिकेल्टन याने सर्वाधिक धावा केल्या. रायनने 32 बॉलमध्ये 181.25 च्या स्ट्राईक रेटने 58 रन्स केल्या. रायनने या दरम्यान 4 सिक्स आणि 6 फोर लगावले. सूर्यकुमार यादव याने 28 चेंडूत 4 चौकार आणि तेवढ्याच षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. रोहित शर्मा याने 12 धावा केल्या. विल जॅक्स याने 21 बॉलमध्ये 29 रन्स केल्या. कर्णधार हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा या दोघांनी निर्णायक क्षणी निराशा केली. हार्दिकने 5 तर तिलकने 6 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. मात्र त्यानंतर नमन धीर आणि कॉर्बिन बॉश या जोडीने छोटेखानी मात्र निर्णायक खेळी करत मुंबईच्या डावात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यामुळे मुंबईला 200 पार पोहचता आलं.
कॉर्बिन बॉश याने 10 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने 2 फोर आणि 1 खणखणीत सिक्सच्या मदतीने 20 रन्स केल्या. तर नमन धीर शेवटपर्यंत नाबाद राहिला. नमनने 11 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 25 रन्स केल्या. तर दीपक चाहर 1 धाव करुन नमनसह नाबाद परतला. तर लखनौकडून पाच जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी आवेश खान आणि मयंक यादव या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर प्रिंस यादव, दिग्वेश राठी आणि रवी बिश्नोई या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
लखनौसमोर 216 धावांचं आव्हान
Innings Break!
A power-packed batting effort from @mipaltan 👊
Will it be enough or will it go #LSG‘s way? 🤔
Scorecard ▶ https://t.co/R9Pol9Id6m #TATAIPL | #MIvLSG pic.twitter.com/GUntWz1Ras
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2025
दरम्यान मुंबईकडे हा सामना जिंकण्यासह सलग पाचवा तर एकूण सहावा विजय मिळवण्याची संधी आहे. मुंबईने याआधी सलग 4 सामने जिंकले आहेत. तसेच लखनौने मुंबईला या मोसमात 4 एप्रिलला पराभूत केलं होतं. त्यामुळे मुंबईकडे आता सलग पाचवा विजय मिळवण्यासह पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे.