
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 20 व्या सामन्यात यजमान मुंबई इंडियन्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मुंबईने आरसीबी विरुद्ध टॉस जिंकला आहे. कर्णधार हार्दिक पंड्या याने फिल्डिंगचा निर्णय घेत आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. मुंबईचा हा या मोसमातील पाचवा तर घरच्या मैदानातील दुसरा सामना आहे. तर दुसऱ्या बाजूला आरसीबीचा हा चौथा सामना आहे. मुंबईला 4 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. त्यामुळे मुंबईसमोर घरच्या मैदानात विजय मिळवण्याचं आव्हान असणार आहे. तसेच आरसीबीला विजयी होण्यासाठी मुंबईचा गड भेदावा लागणार आहे. त्यामुळे या लढतीत कोण यशस्वी होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबईने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह याची एन्ट्री झाली आहे. बुमराहचा अश्वनी कुमार याच्या जागी समावेश करण्यात आला आहे. तर मुंबई फिल्डिंग करण्यात असल्याने रोहित शर्मा दुसऱ्या डावात इमपॅक्ट प्लेअर म्हणून खेळायला येणार आहे. त्यामुळे रोहितचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश नाही. रोहितला लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्याला दुखापतीमुळे मुकावं लागलं होतं. तर दुसर्या बाजूला आरसीबीने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
दरम्यान मुंबई विरुद्ध आरसीबी यांचा आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात एकूण 33 सामन्यांमध्ये आमनासामना झाला आहे. मुंबईने 33 पैकी 19 सामन्यांत आरसीबीचा धुव्वा उडवला आहे. तर आरसीबी 14 वेळा यशस्वी झाली आहे.
मुंबईचा फिल्डिंगचा निर्णय
🚨 Toss 🚨
Mumbai Indians won the toss and elected to bowl first against Royal Challengers Bengaluru!
Updates ▶ https://t.co/Arsodkwgqg#TATAIPL | #MIvRCB | @mipaltan | @RCBTweets pic.twitter.com/hGzZL8JORM
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2025
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि विघ्नेश पुथूर.