
सनरायजर्स हैदराबाद टीम आणि त्यांचे फलंदाज आणि मोठी धावसंख्या आणि स्फोटक बॅटिंगसाठी ओळखले जातात. हैदराबादने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील काही सामन्यात धमाकेदार खेळी करत प्रतिस्पर्धी संघात दहशत तयार केली. हैदराबादने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात विक्रमी धावांचा यशस्वी पाठलाग करत दुसरा विजय मिळवला. मात्र हैदराबाद पुन्हा एकदा आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरली आहे. हैदराबादला मुंबई इंडियन्सविरुद्ध 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 162 धावाच करता आल्या आहेत. मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना बांधून ठेवलं आणि मोठी धावसंख्या करण्यापासून पद्धतशीर रोखलं.
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून सनरायजर्स हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादकडून 20 ओव्हरपर्यंत एकूण 7 जणांनी बॅटिंग केली. त्यापैकी एकाचा अपवाद वगळता इतरांना दुहेरी आकडा गाठला. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी चिवट मारा करत आपल्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये राक्षसी बॅटिंग करणाऱ्या हैदराबादला बांधून ठेवलं. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड या जोडीला पहिल्याच ओव्हरमध्ये जीवनदान मिळालं. मात्र या दोघांना त्याचा खास असा फायदा घेता आला नाही. दोघांनी चांगली खेळी केली. मात्र हैदराबाद टीमला त्यांच्याकडून असलेली आशा पूर्ण करता आली नाही.
अभिषेक शर्मा आणि हेड या दोघांनी 59 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर अभिषेक आऊट झाला. अभिषेकने 28 बॉलमध्ये 7 फोरसह 40 रन्स केल्या. अभिषेक आऊट झाल्यानंतर मुंबईचे गोलंदाज हैदराबादवर आणखी वरचढ ठरले.
विल जॅक्स याने इशान किशन याला 2 धावांवर आऊट केलं. त्यानंतर विल जॅक्स याने मुंबईची मोठी डोकेदुखी दूर केली. जॅक्सने ट्रेव्हिस हेड याला आऊट केलं. हेडने 29 बॉलमध्ये 3 फोरसह 28 रन्स केल्या. नितीश रेड्डी याने 21 बॉलमध्ये 1 फोरसह 19 धावा केल्या आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला. ट्रेन्ट बोल्ट याने नितीशला तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. तर हेनरिक क्लासेन याच्या रुपात हैदराबादने पाचवी आणि शेवटची विकेट गमावली. हेनरिकने 28 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह 37 रन्स केल्या.
पलटण 163 रन्स करणार?
Innings Break
Clinical bowling display from #MI 🙌 #SRH set a target of 1️⃣6️⃣3️⃣ 🎯
Scorecard ▶ https://t.co/8baZ67Y5A2#TATAIPL | #MIvSRH pic.twitter.com/LdejlytyTL
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2025
तर पॅट कमिन्स आणि अनिकेत वर्मा ही जोडी नाबाद परतली. पॅटने 8 धावा केल्या. तर अनिकेतने 2 सिक्ससह 18 रन्स केल्या. मुंबईकडून विल जॅक्स याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.