
आयपीएल 2025 स्पर्धा आता मध्यात येऊन ठेपली आहे. या स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर आता गुणतालिकेत मोठा फरक घडत आहे. असं असताना येत्या काही दिवसात प्लेऑफच्या दृष्टीने ही स्पर्धा आणखी तीव्र होत जाणार आहे. तर काही संघांचं या स्पर्धेतील आव्हान येत्या काही सामन्यात स्पष्ट होणार असं दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्सने पुन्हा एकदा पराभवाचं तोंड पाहिलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात फक्त 103 धावा केल्या आणि विजयासाठी 104 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान अगदी सोपं होतं. सुनील नरीन आणि क्विंटन डीकॉक यांनी पॉवरप्लेमध्येच अर्ध गणित सोपं केलं. कोलकात्याने विजयी आव्हान 10.1 षटकात पूर्ण केलं. यामुळे कोलकाता नाईट रायडर्सला मोठा फायदा झाला. पारड्यात दोन गुण तर पडले वरून नेट रनरेटही सुधारला आहे. त्यामुळे गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. सातव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. कोलकात्याने 6 गुण आणि +0.803 नेट रनरेट आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स संघ नवव्या क्रमांकावर आहे. पण नेट रनरेटचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये स्थान मिळवणं आता खूपच कठीण होणार आहे.
गुजरात टायटन्सचा संघ पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवून 8 गुण आणि +1.413 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे.ल्ली कॅपिटल्सने सलग चार सामन्यात विजय मिळवल्याने 8 गुण आणि +1.278 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 6 गुण आणि +0.539 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. आहे. पंजाब किंग्सने 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवून 6 गुणांसह+0.289 नेट रनरेटसह पाचव्या स्थानी आहे.लखनौ सुपर जायंट्सने पाच पैकी तीन सामन्यात विजय मिळवून 6 गुण आणि +0.078 नेट रनरेट आहे. यासह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.राजस्थान रॉयल्स 4 गुण आणि -0.733 नेट रनरेटसह सातव्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्स पाच पैकी 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे खात्यात फक्त 2 गुण असून -0.010 नेट रनरेटसह आठव्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्स सलग पाच पराभवामुळे 2 गुण आणि -1.554 नेट रनरेटसह नवव्या स्थानी आहे. तर सनरायझर्स हैदराबाद 2 गुण आणि -1.629 नेट रनरेटसह दहाव्या स्थानावर आहे.