IPL 2025 : आरसीबीसोबत 2008 पासून असणाऱ्या विराट कोहलीचा 18 व्या मोसमादरम्यान मोठा निर्णय

Virat Kohli Ipl 2025 : आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. आरसीबीचा फलंदाज विराट कोहली याने मोठा निर्णय घेतला आहे.

IPL 2025 : आरसीबीसोबत 2008 पासून असणाऱ्या विराट कोहलीचा 18 व्या मोसमादरम्यान मोठा निर्णय
Virat Kohli Rcb Ipl
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 11, 2025 | 5:22 PM

आयपीएलच्या 17 मोसमानंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमची पहिल्या ट्रॉफीची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. आरसीबीचं आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न यंदा 18 व्या मोसमात पूर्ण होण शकतं, असं त्यांची कामगिरी पाहून म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आरसीबीने या मोसमात खेळलेल्या 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 2 सामन्यात आरसीबीला पराभूत व्हावं लागलं आहे. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबी ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. या मोसमात आतापर्यंत अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार राहिलेल्या विराट कोहली यानेही चमकदार कामगिरी केली आहे. मात्र विराटने या हंगामादरम्यान एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर विराटच्या निर्णयाची एकच चर्चा पाहायला मिळत आहे. विराट आयपीएलच्या सुरुवातीपासून म्हणजेच 2008 पासून आरसीबीसोबत आहे.

विराटने स्पोर्ट्स साहित्य बनवणाऱ्या पूमा कंपनीसह सर्व संबंध संपवले आहेत. विराट कोहली पूमा इंडियाचा ब्रँड अॅम्बेसडर होता. पूमा इंडिया आणि विराट या दोघांमध्ये 110 कोटींचा करार झाला होता. विराटचा पूमासोबतचा 8 वर्षांचा करार संपला आहे. विराटने त्यानंतर पूमासोबत करारबद्ध न राहण्याचा निर्णय घेतला आहे.

विराटची गांगुलीच्या कंपनीत एन्ट्री

विराटने पूमाची साथ सोडल्यानंतर एजिलिटास कंपनीसह जोडला गेला आहे. विराट या कंपनीत गुंतवणूकदारही आहे. एजिलिटास कंपनीचे एमडी अभिषेक गांगुली हे याआधी पूमा इंडिया दक्षिण-पूर्व आशियाचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. विराटने आतापर्यंत एजिलिटास कंपनी खूप गुंतवणूक केली आहे.

विराटने आतापर्यंत अनेक बड्या ब्रँडसोबत करार केले आहेत. तसेच विराटने या ब्रँडमध्ये गुंतवणूकही केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनसार, विराटचा सन फार्मा वॉलिनी, एमआरएफ टायर्स, उबर इंडिया, व्हीवो, अमेरिकन टुरिस्टर यांच्यासह करार आहे. तसेच विराट अनेक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसडरही आहे.

विराटने मोठी ऑफर नाकारली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, अभिनंदन सिंग, रोमॅरियो शेफर्ड, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, मोहित राठी आणि स्वस्तिक चिकारा.