RCB vs GT Toss : गुजरातने टॉस जिंकला, आरसीबीची घरच्या मैदानात बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमधून तगडा खेळाडू बाहेर

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Playing 11 Toss Ipl 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळरुविरुद्धच्या सामन्यातून गुजरात टायटन्सचा गेमचेंजर बॉलर बाहेर झाला आहे. या खेळाडूने माघार घेतल्याने टीमला मोठा झटका लागला आहे.

RCB vs GT Toss : गुजरातने टॉस जिंकला, आरसीबीची घरच्या मैदानात बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनमधून तगडा खेळाडू बाहेर
Rajat Patidar and Shubman Gill RCB vs GT Toss Ipl 2025
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 02, 2025 | 7:19 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 14 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे आरसीबीच्या घरच्या मैदानात अर्थात एम चिन्नास्वामी स्टेडिममध्ये करण्यात आला आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील तिसरा सामना आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. गुजरात टायटन्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार शुबमन गिल याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आरसीबी घरच्या मैदानात गुजरातविरुद्ध किती धावा करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आरसीबीकडे विजयी हॅटट्रिकची संधी

आरसीबीने या मोसमातील सलग दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे आरसीबी गुजरातवर मात करत विजयी हॅटट्रिक करण्यासाठी तयार आहे. तर दुसऱ्या बाजूला विजयी घोडदौड कायम राखत आरसीबीला रोखण्याचं आव्हान गुजरातसमोर असणार आहे. आरसीबीने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला गुजरातला मोठा झटका लागला आहे. गुजरातचा मॅचविनर गोलंदाज कगिसो रबाडा वैयक्तिक कारणामुळे बाहेर झाला आहे. त्यामुळे रबाडाच्या जागी अर्शद खान याचा समावेश करण्यात आला आहे. गुजरातने अशाप्रकारे प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे.

गुजरातकडे बरोबरी करण्याची संधी

दरम्यान गुजरातकडे हा सामना जिंकून आरसीबीविरुद्ध बरोबरी करण्याची संधी आहे. उभयसंघात आतापर्यंत एकूण 5 सामने खेळवण्यात आले आहेत. आरसीबीने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर गुजरातने 2 वेळा पलटवार केला आहे. त्यामुळे गुजरातचा हा सामना जिंकून आरसीबीविरुद्ध 3-3 अशी बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.

गुजरातच्या बाजूने नाणेफेकीचा कौल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग इलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, आर साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि इशांत शर्मा