RCB vs PBKS : आरसीबीला IPL 2025 Final मोठा झटका, 2 मॅचविनर खेळाडूंबाबत मोठी अपडेट

Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Final :आयपीएल 2025 फायनलआधी रॉयल चॅलेंजर्ससाठी डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. आरसीबीचे 2 खेळाडू अंतिम सामन्यात खेळणार की नाही? याबाबत अनिश्चितता आहे. जाणून घ्या.

RCB vs PBKS : आरसीबीला IPL 2025 Final मोठा झटका, 2 मॅचविनर खेळाडूंबाबत मोठी अपडेट
RCB IPL 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Jun 03, 2025 | 4:35 PM

आयपीएल स्पर्धेत यंदा तब्बल 9 वर्षांनंतर नवी चॅम्पियन टीम मिळणार आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) अंतिम सामन्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. अंतिम सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा महामुकाबला जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये अर्थात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही संघांनी सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. मात्र सामन्याला काही तास बाकी असताना आरसीबीच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.

आरसीबीला फायनलआधी मोठा झटका लागला आहे. सामना सुरु व्हायला काही तास बाकी आहेत. मात्र त्याआधी कर्णधार रदत पाटीदार याला त्यांचा स्टार खेळाडू खेळणार की नाही? याबाबत माहित नाही. हॅमस्ट्रिंगचा त्रास असलेला ऑलराउंडर टीम डेव्हिड या अंतिम सामन्यासाठी उपलब्ध असणार की नाही? याबाबत रजत पाटीदारला माहिती नाही. तसेच मॅचविनर ओपनर फिल सॉल्ट याच्या खेळण्याबाबतही संभ्रम कायम आहे.

कॅप्टन रजत पाटीदार काय म्हणाला?

टीम डेव्हिड अंतिम सामन्यात खेळणार का? असं जेव्हा रजतला विचारण्यात आलं. रजतने काही कल्पना नाही, असं उत्तर दिलं. “आतापर्यंत मला टीम डेव्हिड याच्याबाबत कल्पना नाही. आम्ही तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगू, असं डॉक्टरांनी सांगितलंय”, असं रजतने सांगितलं. टीम डेव्हीडला गेल्या 2 सामन्यात दुखापतीमुळे खेळता आलं नाही. तर दुसऱ्या बाजूला फिल सॉल्ट नेट्स प्रॅक्टीसमध्ये दिसला नाही.

आरसीबीने 2 जूनला जोरदार सराव केला. मात्र सामन्याच्या पूर्वसंध्येला सरावादरम्यान सॉल्ट दिसला नाही. त्यामुळे तो खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुर्देवाने हे दोघेही मॅचविनर खेळाडू अंतिम सामन्यात खेळू शकले नाहीत तर तो आरसीबीसाठी मोठा झटका असेल.

कोण मारणार मैदान?

आरसीबीला गेल्या 17 वर्षांमध्ये एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. आरसीबीने याआधी 3 वेळा अंतिम सामन्यात प्रवेश केला. मात्र तिन्ही वेळा पराभूत व्हावं लागलं. आरसीबीची यंदाची अंतिम फेरीत खेळण्याची चौथी वेळ आहे. त्यामुळे 3 वेळा अंतिम फेरीत जे झालं ते यंदा होऊ नये, यासाठी आरसीबी जोरदार प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आरसीबीला फिल सॉल्ट आणि टीम डेव्हीडची साथ मिळणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशात हे दोघे या महामुकाबल्यासाठी उपलब्ध नसले तर आरसीबीसाठी हा मोठा झटका असेल. आता हे दोघे खेळणार की नाहीत? हे येत्या काही तासांतच स्पष्ट होईल.