IPL 2025 Final : विराट कोहलीने फायनलमध्ये एक चौकार मारला आणि मोठा विक्रम केला नावावर, काय ते वाचा

आयपीएल 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली जोडी मैदानात आली. या सामन्यात विराट कोहलीने एक चौकार मारला आणि विक्रम नावावर केला.

IPL 2025 Final : विराट कोहलीने फायनलमध्ये एक चौकार मारला आणि मोठा विक्रम केला नावावर, काय ते वाचा
विराट कोहली
Image Credit source: RCB Twitter
| Updated on: Jun 03, 2025 | 8:51 PM

आयपीएल 2025 स्पर्धेचं जेतेपद कोण मिळणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही तासातच या सामन्याचा निकाल लागणार आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून पंजाब किंग्सने गोलंदाजी स्वीकारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून फलंदाजीसाठी विराट कोहली आणि फिलिप सॉल्ट ही जोडी मैदानात आली. या सामन्यात फिलिप सॉल्टने आक्रमक खेळीला सुरुवात केली. तर विराट कोहली सावधपणे खेळत होता. पण दुसऱ्या षटकात काइल जेमिसनच्या जाळ्यात अडकला. जेमिसनच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना चेंडू खूपच वर चढला आणि श्रेयस अय्यरने अप्रतिम झेल पकडला. फिलिप सॉल्टचा खेळ 16 धावांवर आटोपला. पण त्यानंतर विराटने मयंक अग्रवालसोबत मोर्चा सांभाळला. काइल जेमिसन पंजाबकडून चौथं षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीने चौकार मारला आणि एक विक्रम आपल्या नावावर केला.

विराट कोहलीन आयपीएल इतिहासात सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम केला आहे. या यादीत विराट कोहलीने माजी क्रिकेटपटू शिखर धवनला मागे टाकलं आहे. क्वॉलिफायर 1 फेरीत विराट कोहलीने त्याच्या चौकारांची बरोबरी केली होती. पण अंतिम सामन्यात विराट कोहलीने एक चौकार मारला आणि त्याच्या पुढे निघून गेला. शिखर धवनने 768 चौकार मारले आहेत. पण विराट कोहलीच्या नावावर 771 चौकार झाले आहे. तिसऱ्या क्रमांकावर डेविड वॉर्नर असून त्याने 663 चौकार मारले आहेत. तर चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने 640 चौकार मारले आहेत .

विराट कोहलीने या सामन्यात 35 चेंडूत 43 धावांची खेळी केली. त्याने 3 चौकार मारले. अझमतुल्लाहच्या गोलंदाजीवर शॉर्ट बॉलवर पूल मारताना विराट कोहली चुकला. अझमतुल्लाहने या संधीचं सोनं केलं आणि धावत जात उत्तम झेल पकडला. या सामन्यात विराट कोहलीने 122.86 स्ट्राईक रेटने धावा केल्या. विराट कोहलीची विकेट मिळाल्याने पंजाब किंग्सच्या गोटात आनंदाचं वातावरण होते. कारण ही विकेट किती महत्त्वाची याची जाणीव आहे. कारण विराट कोहली शेवटपर्यंत टिकला असता तर धावगतीत नक्कीच वाढ झाली असती.