AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs SRH : आरसीबीकडे नंबर 1 होण्याची संधी, सनरायजर्स हैदराबाद रोखणार?

Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Ipl 2025 : रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. तर ऑलराउंडर पॅट कमिन्स याच्याकडे सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. आरसीबीसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे.

RCB vs SRH : आरसीबीकडे नंबर 1 होण्याची संधी, सनरायजर्स हैदराबाद रोखणार?
Virat Kohli And Dinesh Karthik Rcb Ipl 2025Image Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 23, 2025 | 4:27 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील प्लेऑफसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. मात्र त्यानंतर आता टॉप 2 साठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. टॉप 2 मध्ये असणाऱ्या संघाला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 2 वेळा संधी मिळते. त्यामुळे प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या संघांत कायम चुरस पाहायला मिळते. मात्र यामध्ये स्पर्धेतून बाहेर झालेले संघही निर्णायक भूमिका बजावतात. या हंगामातील 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. आरसीबीने प्लेऑफचं तिकीट मिळवलंय. मात्र त्यानंतरही आरसीबीसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. तर दुसऱ्या बाजूला सनरायजर्स हैदराबाद केव्हा स्पर्धेतून बाहेर झालीय. मात्र त्यानंतरही एसआरएच आरसीबीचा गेम करु शकते.

सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दोन्ही संघांचा हा या मोसमातील 13 वा सामना असणार आहे.तसेच दोन्ही संघांची या मोसमात आमेसामने येण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. आरसीबीचा हा सामना जिंकून टॉप 2 मध्ये कायम राहण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आरसीबी कोणत्याही स्थितीत सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणार, हे निश्चित आहे. तर दुसऱ्या बाजूला हैदराबादकडे गमावण्यासारखं काहीच नाही. मात्र जाता जाता शेवटच्या 2 सामन्यांमध्ये विजयी मिळवण्याचा प्रयत्न हैदराबादचा असेल. तसेच हैदराबादच्या गोटात वादळी खेळी करणारे अनेक फलंदाज आहेत. त्यामुळे हैदराबादमध्ये एकतर्फी विजय मिळवण्याची क्षमता आहे. त्यामुळे या सामन्यात जोरदार रंगत पाहायला मिळू शकते.

दोन्ही संघाची कामिगरी

आरसीबीने 12 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर 3 वेळा आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आरसीबी 17 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर हैदराबादने 12 पैकी 4 सामनेच जिंकले आहेत. हैदराबादला तब्बल 7 वेळा प्रतिस्पर्धी संघांनी पराभवाची धुळ चारली आहे. तर हैदराबादचाही 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. हैदराबाद 9 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात 24 सामने खेळवण्यात आले आहेत. आकडे पाहता हैदराबाद आरसीबी विरुद्ध वरचढ राहिल्याचं स्पष्ट होतं. हैदराबादने 24 पैकी 13 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीने 11 सामन्यांमध्ये पलटवार करत विजय मिळवला आहे.

सामना कुठे आणि कधी?

दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. सामन्याचं आयोजन हे लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल आणि लॅपटॉपवर लाईव्ह सामन्याचा थरार अनुभवता येईल.

Follow Us
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...