AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : प्लेऑफ स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी आनंदाची बातमी, झालं असं की…

आयपीएल 2025 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपली जागा पक्की केली आहे. आता टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्याचं आव्हान आहे. स्पर्धेत दोन सामने शिल्लक आहे. 23 आणि 27 मे रोजी हे सामने होणार आहेत. हे दोन्ही सामने लखनौला होणार आहेत. पण तत्पूर्वी आरसीबीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

IPL 2025 : प्लेऑफ स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी आनंदाची बातमी, झालं असं की...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुImage Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 21, 2025 | 3:01 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यापैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना ड्रॉ झाल्याने एक गुण पदरात पडला. आरसीबी संघ 17 गुण आणि +0.482 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता उर्वरित दोन सामने सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांसोबत आहेत. जर हे दोन्ही सामने जिंकले तर आरसीबीचा संघ गुणतालिकेत टॉप 2 मध्ये राहील. 23 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि 27 मे रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सामने होणार आहे. असं असताना 27 मे पूर्वी संघात दिग्गज गोलंदाजाचं पुनरागमन होणार आहे. आरसीबीचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड उर्वरित सामन्यांसाठी भारतात परतणार आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या भीतीमुळे आयपीएल स्थगित झाल्यानंतर हेझलवूड मायदेशी गेला होता. तसेच दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात खांद्याला दुखापत झाल्याने हेझलवूड चेन्नईविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता.

भारत पाकिस्तान तणावपूर्ण स्थितीत जोश हेझलवूड ऑस्ट्रेलियाला परतला आणि तिथेच उपचार सुरू केले. आता पूर्ण तंदुरुस्ती मिळवलेल्या आरसीबीच्या या वेगवान गोलंदाजाने सराव सुरू केला आहे. जोश हेझलवूड रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात पुढील रविवारी म्हणजेच 25 मे रोजी संघात सामील होणार असल्याची माहिती आहे. म्हणजेच जोश हेझलवूड 23 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी देखील उपलब्ध नसेल. जर 25 मे रोजी आरसीबी संघात सामील झाला तर तो 27 मे रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकतो.

जोश हेझलवूडच्या पुनरागमनाच्या बातमीने आरसीबीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. कारण यावेळी हेझलवूडने आरसीबीसाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने 10 सामन्यांमध्ये 36.5 षटके टाकली आहेत आणि एकूण 18 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच जोश हेझलवूडने आरसीबीसाठी सर्वाधिक डॉट बॉल टाकले आहेत. त्याने 10 सामन्यांमध्ये एकूण 103 डॉट बॉल टाकले आहेत. त्यामुळे आरसीबीच्या विजयात हेझलवूडचा मोठा वाटा आहे. हेझलवूड प्लेऑफपूर्वी आरसीबी संघात सामील होणे निश्चितच चांगली बातमी असणार आहे. मागच्या 17 पर्वात आरसीबीला काही जेतेपद मिळवता आलं नाही. पण यंदा तशी शक्यता निर्माण झाल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?.
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले.
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून...
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून....
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला.
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?.
40 सेकंदात कुठं चूक झाली? लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताची कारणं काय?
40 सेकंदात कुठं चूक झाली? लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताची कारणं काय?.
लकी नंबरच्या तारखेलाच मृत्यू, विजय रूपाणींच्या 1206 अंकाचा योगायोग काय
लकी नंबरच्या तारखेलाच मृत्यू, विजय रूपाणींच्या 1206 अंकाचा योगायोग काय.
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?.