IPL 2025 SRH vs GT Live Streaming: गुजरातला विजयी हॅटट्रिकची संधी, हैदराबाद रोखणार का?

Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans Live Streaming: रविवारी 6 एप्रिलला सनरायजर्स हैदराबादसमोर घरच्या मैदानात गुजरात टायटन्सचं आव्हान असणार आहे. सलग 3 सामने गमावल्याने हैदराबादसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे.

IPL 2025 SRH vs GT Live Streaming: गुजरातला विजयी हॅटट्रिकची संधी, हैदराबाद रोखणार का?
SRH vs GT IPL 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 05, 2025 | 10:51 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 19 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. पॅट कमिन्स हैदराबादचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. हैदराबादचा हा या मोसमातील पाचवा आणि गुजरातचा चौथा सामना असणार आहे. गुजरातची या मोसमात पराभवाने सुरुवात झाली. मात्र त्यानंतर गुजरातने सलग दोन्ही सामने जिंकले. तर दुसर्‍या बाजूला विजयी सुरुवातीनंतर हैदराबादला सलग 3 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे हैदराबादसमोर घरच्या मैदानात गुजरातला रोखत विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान असणार आहे.

हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना केव्हा?

हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना रविवारी 6 एप्रिलला होणार आहे.

हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना कुठे?

हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद येथे होणार आहे.

हैदराबाद विरुद्ध गुजरात सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

हैदराबाद विरुद्ध गुजरात सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल. तर जिओहॉटस्टार एपवरुन लाईव्ह सामना पाहायला मिळेल.

सनरायझर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिनव मनोहर, सचिन बेबी, हर्षल पटेल, ॲडम झम्पा, मोहम्मद शमी, राहुल चहर, जयदेव उनाडकट, कमिंदू मेंडिस, झीशान अन्सारी, वियान मुल्डर, अथर्व तायडे, सिमरन सिंह, एशान मलिंगा आणि अनिकेत वर्मा.

गुजरात टायटन्स टीम: साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), राहुल तेवतिया, शाहरुख खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, शेरफेन रदरफोर्ड, ग्लेन फिलिप्स, इशांत शर्मा, अनुज रावत, वॉशिंग्टन सुंदर, महिपाल लोमरोर, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, करीम जनात, जेराल्ड कोएत्झी, मानव सुथार, कुमार कुशाग्रा आणि गुरनूर ब्रार.