AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 Winner Prediction : आयपीएलची ट्रॉफी कोणता संघ जिंकणार?, बड्या खेळाडूच्या भविष्यवाणीने सर्वच थक्क

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्समध्ये हा सामना खेळवला जात आहे. त्यापूर्वीच एका बड्या खेळाडूने आयपीएलच्या विनरवरून मोठी भविष्यवाणी केली आहे.

IPL 2025 Winner Prediction : आयपीएलची ट्रॉफी कोणता संघ जिंकणार?, बड्या खेळाडूच्या भविष्यवाणीने सर्वच थक्क
IPL winner
| Updated on: Jun 01, 2025 | 5:14 PM
Share

IPL 2025 winner prediction : आज आयपीएलच्या क्वालिफायर-2चा सामना होत आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्समध्ये हा सामना खेळवला जात आहे. त्यापूर्वीच डेव्हिड वॉर्नरने आयपीएलच्या विनरवरून मोठी भविष्यवाणी केली आहे. आयपीएल 2025ची ट्रॉफी कोण जिंकेल हे वॉर्नरने सांगितलं आहे. तसेच फायनलमध्ये आरसीबीसााठी प्लेअर ऑफ द मॅच कोण होणार? याची भविष्यवाणीही वॉर्नरने केली आहे. वॉर्नरची ही भविष्यवाणी ऐकून सर्वच थक्क झाले आहेत.

डेव्हिड वॉर्नरने कर्णधार असताना सनराईजर्स हैदराबादला चॅम्पियन केलं होतं. पण यंदाच्या ऑक्शनमध्ये ते लिलावात विकले गेले नाही. त्यानंतर ते पीएसएलमध्ये खेळले होते. वॉर्नरच्या एका फॅनने सोशल मीडियावर आयपीएल संदर्भात एक सवाल केला होता. टाटा आयपीएल 2025मध्ये कोण चॅम्पियन होईल? तुम्हाला काय वाटतं? असा सवाल वॉर्नरला विचारण्यात आला होता. त्यावर त्याने उत्तर दिलं आहे.

कोण होणार विजेता?

आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून आता पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ट्रॉफी जिंकेलेली नाही. पण या सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दमदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंग या तिन्ही स्तरावर आरसीबीने नेत्रदिपक कामगिरी केली आहे. आरसीबीने पंजाबला क्वालिफायर 1 मध्ये पराभूत करून फायनलमध्ये स्थान बळकट केलं आहे.

डेव्हिड वॉर्नरनेही भविष्यवाणी करताना आरसीबीचं नाव घेतलं आहे. त्याने चाहत्याच्या पोस्टला उत्तर दिलंय. मला वाटतं आरसीबी ट्रॉफी जिंकेल. तसेच जोश हेजलवूड प्लेअर ऑफ द मॅच होईल, असं डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे. त्यामुळे अंतिम सामन्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. वॉर्नरची भविष्यवाणी खरी ठरणार की खोटी? यावरून आता सोशल मीडियावर घमासान सुरू झालं आहे. येत्या 3 जून रोजी गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. तर आज आज दुसरा क्वालिफायर सामना होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्सचा सामना आज होत आहे. या सामन्यात जी टीम जिंकेल, तिची भिडत आरसीबीशी होणार आहे.

Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?