
कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या 2 संघांनी प्रत्येकी 5-5 वेळा आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे. सीएसके आणि मुंबईनंतर कोलकाता नाईट रायडर्स सर्वाधिक वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारी टीम आहे. केकेआरने एकूण 3 वेळा आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे. केकेआरने 2012, 2014 आणि 2024 अशा 3 वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली होती. त्यामुळे यंदा केकेआरचं चौथ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा प्रयत्न असणार आहे. या निमित्ताने केकेआरच्या 5 मॅचविनर खेळाडूंबाबत जाणून घेऊयात जे कोणत्याही क्षणी आपल्या बाजूने सामना फिरवण्याची क्षमता ठेवतात.
फिन एलन, कॅमरुन ग्रीन, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती आणि मथीशा पथिराणा 5 खेळाडूंच्या कामगिरीवर केकेआर जिंकणार की सामना गमावणार? हे निश्चित होईल.
न्यूझीलंडच्या फिन एलन याने टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. फिनने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकून न्यूझीलंडला अंतिम फेरीत पोहचवण्यात प्रमुख योगदान दिलं होतं. फिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 33 चेंडूत शतक ठोकलं होतं. फिनने उपांत्य फेरीत 33 चेंडूत शतक झळकावलं होतं. फिनने टी 20 क्रिकेटमध्ये 6 शतकं झळकावली आहेत.
कॅमरुन ग्रीन ऑलराउंडर आहे. त्यामुळे ग्रीनकडून टीमला बॅटिंग, बॉलिंगसह दमदार फिल्डिंग अपेक्षित असणार आहे. केकेआरने ग्रीनसाठी तब्बल 25 कोटी 20 लाख रुपये मोजले आहेत. त्यामुळे ग्रीन पैसावसूल कामगिरी करण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सुनील नारायण याच्या फिरकी बॉलिंगचा क्रिकेट विश्वात दबदबा आहे. तसेच सुनील बॅटिंग करण्यातही माहीर आहे. त्यामुळे सुनील ऑल इन 1 प्लेअर आहेत. केकेआरने सुनीला 12 कोटी रुपयांत रिटेन केलं आहे.
मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याच्या फिरकीसमोर प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांचा चांगलाच कस लागणार आहे. त्यामुळे वरुणची कामगिरी निर्णायक ठरणार आहे.
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराणा याला केकेआरने 18 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवलं होतं. मथीशाला चेन्नई सुपर किंग्सकडून खेळण्याचा चांगला अनुभव आहे. मात्र यंदा तो आपल्याच माजी संघाविरुद्ध खेळणार आहे. अशात मथीशा कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
केकेआरची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन एलेन, कॅमरन ग्रीन, अंगकृष रघुवंशी, रिंकू सिंह, रमनदीप सिंह, सुनील नारायण, अनुकूल रॉय, वैभव अरोरा, मथीशा पथिराना, आकाश दीप आणि वरुण चक्रवर्ती.