IPL 2026 Auction : आयपीएलचा पहिला प्लेयर अनसोल्ड, तर पृथ्वी शॉ-सरफराज खान पुन्हा कमनशिबी

आयपीएल 2026 मिनी ऑक्शनला सुरुवात झाली आहे. पहिल्याच टप्प्यात दिग्गज खेळाडूंसाठी बोली लागली. पण दिग्गज खेळाडूंवर कोणीच बोली लावली नाही. पृथ्वी शॉ, सरफराज खान मेगा लिलावानंतर मिनी लिलावतही अनसोल्ड राहिले.

IPL 2026 Auction : आयपीएलचा पहिला प्लेयर अनसोल्ड, तर पृथ्वी शॉ-सरफराज खान पुन्हा कमनशिबी
IPL 2026 Auction : आयपीएलचा पहिला प्लेयर अनसोल्ड, तर पृथ्वी शॉ-सरफराज खान पुन्हा कमनशिबी
Image Credit source: IPL Twitter
| Updated on: Dec 16, 2025 | 3:55 PM

आयपीएल 2026 मिनी लिलावाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. पहिलंच नाव जेक फ्रेझर मॅकगर्क याचं नाव पुकारलं गेलं. त्याच्यासाठी कोण बोली लावणार याची उत्सुकता होती. लिलावकर्ती वारंवार कोण बोली लावतेय याकडे डोळे लावून होती. पण त्यासाठी कोणीही पेडल वर केलं नाही. त्यामुळे मिनी लिलावातील पहिल्याच खेळाडू अनसोल्ड राहिला. त्यामुळे पुढे काय होतं याची उत्सुकता होती. त्यानेतर डेविड मिलरचं नाव पुकारलं गेलं. त्याच्यासाठी पहिल्या काही मिनिटात कोणीही रस दाखवला नाही. त्यामुळे हा खेळाडूही अनसोल्ड राहतो की काय? याबाबत चर्चा होती. पण दिल्ली कॅपिटल्सने पेडल वर केलं आणि त्याला त्याच्या बेस प्राईसवर संघात घेतलं. त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. त्यानंतर नाव आलं ते पृथ्वी शॉ.. त्याच्यासाठी कोण बोली लावणार याची उत्सुकता होती. पण झालं असं की यंदाही पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिला.

आयपीएल 2026 मिनी लिलावात डेवॉन कॉनवेही अनसोल्ड राहिला आणि त्यानंतर कॅमरून ग्रीनसाठी मोठी बोली लागली. त्याच्यासाठी केकेआरने 25.20 कोटी मोजले आणि संघात घेतलं. त्यानंतर नाव आलं ते सरफराज खानचं.. त्याच्यासाठी कोण बोली लावणार याची उत्सुकता होती. पण त्याची झोळीही रिक्त झाली. मेगा लिलावानंतर मिनी लिलावतही त्याच्यासाठी कोणी बोली लावली नाही. बॅट्समनच्या पहिल्या टप्प्यात दोन खेळाडू विकले गेले. यात डेविड मिलर आणि कॅमरून ग्रीन यांनी भाव खाल्ला. इतर फलंदाजांना नाकारलं गेलं.

दुसऱ्या टप्प्यात 7 अष्टपैलू खेळाडूंची नावं पुकारली गेली. पहिलं नाव गस एटकिनसनचं नाव घेतलं आणि अनसोल्ड राहिला. रचिन रविंद्र, लियाम लिव्हिंगस्टोन, वियान मल्डर हे खेळाडू अनसोल्ड राहिले. वानिंदु हसरंगाला लखनौ सुपरजायंट्सने 2 कोटींच्या बेस प्राईसवर घेतलं. तर वेंकटेश अय्यरसाठी आरसीबीने 7 कोटींची रक्कम मोजली. दीपक हुड्डा या टप्प्यात अनसोल्ड राहिला.

तिसऱ्या टप्प्यात विकेटकीपर फलंदाज आले. यात पहिलं नाव केएस भारतचं घेतलं गेलं. पण त्याला कोणीच घेतलं नाही. क्विंटन डी कॉकला मुंबई इंडियन्सने 1 कोटींच्या बेस प्राईसवर घेतलं. रहमनतुल्लाह गुरबाज, जॉनी बेअरस्टो, जेमी स्मिथ हे अनसोल्ड राहिले. तर बेन डकेटसाठी दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी मोजले आणि बेस प्राईसवर घेतलं. न्यूझीलंडचा फिन एलेनसाठी केकेआरने 2 कोटी मोजले.