IPL 2026 Playoff: चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेऑफचं गणित आरसीबीच्या हाती, कसं काय ते समजून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई सुपर किंग्स संघ आहे. अजूनही चेन्नई सुपर किंग्सचं 16 गुणांचं गणित सुटू शकतं. दोन सामन्यांच्या खेळ शिल्लक आहे. पण ऋतुराज गायकवाडच्या संघाचे प्लेऑफमधील भवितव्य आता केवळ त्यांच्या हातात राहिलेले नाही. त्यासाठी एक सुटणं गरजेचं आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत 59 सामन्यांचा खेळ संपला असून आता प्लेऑफची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांनी 16 गुणांचं गणित सोडवलं आहे. पण अजूनही या दोन्ही संघांचं प्लेऑफमधील स्थान काही पक्कं झालेलं नाही. पण ढोबळमानाने 16 गुण मिळवलेला संघ प्लेऑफमध्ये पोहोचतो. असं असताना हे दोन संघ वगळतात इतर संघांमध्ये अजूनही प्लेऑफच्या आशा जिवंत आहेत. यापैकी चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफचं गणित सुटू शकते. यासाठी एक समीकरण जुळून येणं गरजेचं आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने 12 सामने खेळले असून 6 विजय आणि 6 पराभवासह 12 गुण मिळवले आहेत. त्यांचा नेट रनरेट हा +0.027 इतका असून सहाव्या स्थानावर आहे. अजूनही दोन सामन्यांचा खेळ शिल्लक असून त्यात विजय मिळवला तर 16 गुणांचं गणित सुटू शकते. चेन्नई सुपर किंग्सचे पुढील प्रतिस्पर्धी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स आहेत. या दोन्ही संघांनी पराभूत केलं तर 16 गुण होतील.
चेन्नई सुपर किंग्सने उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफचा मार्ग सोपा होईल. पण पुढील दोन विजयांमुळे प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार नाही, कारण सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांचेही दोन सामने शिल्लक आहेत. या दोन्ही संघांनी त्यांचे पुढील दोन सामने जिंकले, तर त्यांचे अनुक्रमे 18 आणि 17 गुण होतील. यासाठी यासाठी चेन्नई सुपर किंग्स संघाचा प्लेऑफचं गणित रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या हाती आहे. कारण सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स संघ त्यांचे पुढील सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळणार आहेत. जर आरसीबीने हे सामने जिंकले, तर चेन्नई सुपर किंग्स संघाचा प्लेऑफचा मार्ग सोपा होईल.
जर आरसीबीने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं, तर सनरायझर्स हैदराबादचे गुण 14 वरच राहतील. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा सामना जिंकून 16 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकते. तसेच, जर आरसीबीने पंजाब किंग्सला पराभूत केलं, तर पंजाब किंग्सने शेवटचा सामना जिंकला तरी त्यांना फक्त 15 गुण होतील. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्स 16 गुणांसह टॉप 4 मध्ये प्रवेश करू शकते. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे चाहते आरसीबीने पुढचे दोन्ही सामने जिंकावे अशी प्रार्थना करत आहेत.