IPL 2026, CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने कौल, धोनी पॅट खेळणार की नाही?

आयपीएल 2026 स्पर्धेतील 27वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विजय मिळवून टॉप 5 मध्ये येण्याचा प्रयत्न असेल.

IPL 2026, CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने कौल, धोनी पॅट खेळणार की नाही?
IPL 2026, CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने कौल, ऋतुराज गोलंदाजीला पसंती देत म्हणाला...
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 18, 2026 | 7:11 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 27व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले आहे. दोन्ही संघांसाठी गुणतालिकेतील स्थिती पाहता हा सामना महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यात विजय मिळवून पुन्हा एकदा भक्कम स्थितीत येण्याची संधी आहे. सनराझर्स हैदराबाद संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. तर चेन्नई सुपर किंग्स संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. दोन्ही सघांनी पाच पैकी 2 सामन्यात विजय मिळवून 4 गुण कमावले आहे. आता या सामन्यात 2 गुणांची कमाई करून टॉप 5 मध्ये कोण येणार याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागून आहे. नाणेफेकीचा कौल चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने लागल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडने प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं. या सामन्यात पॅट कमिन्स आणि महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही याची चर्चा होती. मात्र दोघंही या सामन्यात नसणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी खूप चांगली दिसतेय, त्यात फारसा बदल होणार नाही, त्यामुळे आम्ही पाठलाग करण्याचा विचार करत आहोत. तळापासून वर येणे चांगले आहे. दुसऱ्या सामन्यापासून आम्ही मूलभूत गोष्टी योग्य प्रकारे करायला सुरुवात केली. सातत्य राखणे हीच गुरुकिल्ली आहे. मागच्या सामन्यात मला वाटले की नूरने खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि तो पुन्हा लयीत परतला आहे हे पाहून आनंद झाला, तसेच अंशुलसुद्धा अखेरच्या षटकांमध्ये खूप चांगली गोलंदाजी करत आहे. तुमच्या भाषेत ही खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम दिसतेय, पण आम्हाला तिचे मूल्यांकन करावे लागेल.

इशान किशनच्या मनासारखं झालं त्याने सांगितलं की, मला वाटतं आम्ही प्रथम फलंदाजी करायला हवी होती. खेळपट्टी चांगली दिसतेय, त्यामुळे आम्हाला एक चांगली धावसंख्या उभारायची आहे. तुम्हाला संघासाठी फलंदाजी करायची असते, वैयक्तिक कामगिरीसाठी नाही. आम्हाला प्रत्येक सामना स्वतंत्रपणे खेळायचा आहे आणि आम्ही सध्या कुठे आहोत याने काही फरक पडत नाही, कारण ही स्पर्धा खूप मोठी आहे. मला वाटतं सुरुवातीला चेंडू थोडा स्विंग होईल आणि फलंदाजांनी चेंडूवर लक्ष ठेवून चांगली फलंदाजी केली पाहिजे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), सरफराज खान, शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस, जेमी ओव्हरटन, मॅथ्यू शॉर्ट, अंशुल कंबोज, नूर अहमद, मुकेश चौधरी, गुर्जपनीत सिंग.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कर्णधार), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवांग कुमार, प्रफुल हिंगे, साकिब हुसेन, एशान मलिंगा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us