IPL 2026 स्पर्धेपूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स संघाचं जेतेपदाचं आव्हान संकटात! झालं असं की…

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होईल की नाही? याबाबत आतापासून शंका व्यक्त केली जात आहे.

IPL 2026 स्पर्धेपूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स संघाचं जेतेपदाचं आव्हान संकटात! झालं असं की...
IPL 2026 स्पर्धेपूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स संघाचं जेतेपदाचं आव्हान संकटात! झालं असं की...
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 21, 2026 | 5:15 PM

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मिनी लिलावात मोठ्या मेहनतीने कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायझीने संघाची बांधणी केली. पण संघ बांधणी केल्यानंतर एका पाठोपाठ एक धक्क्यांची मालिका सुरू झाली. बांगलादेशमधील हिंसाचारामुळे मुस्तफिझुर रहमानला संघातून काढावं लागलं. त्याची जागा भरून काढण्यासाठी झिम्बाब्वेचा वेगवाना गोलंदाज ब्लेसिंग मजुरबानी याला घेतलं. त्याला संघात घेत नाही तोच स्टार गोलंदाज हर्षित राणा या स्पर्धेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव झालेल्या सराव सामन्यात दुखापत झाली. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकला. त्यानंतर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. पण त्यातून अजून सावरलेला नाही त्यामुळे स्पर्धेला मुकला. या धक्क्यातून सावरत नाही तर वेगवान गोलंदाजीतील आणखी एक मोहरा गळला. वेगवान गोलंदाज आकाश दीप या स्पर्धेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कोलकात्याची गोलंदाजीचं युनिट कमकुवत पडलं आहे.

एका रिपोर्टनुसासर, आकाश दीप पाठिच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे आणि त्यातून अजून सावरलेला नाही. त्याच्या पाठीला स्ट्रेस फ्रॅक्चर आहे आणि काही वेळ बंगळुरुमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये रिहॅब प्रक्रियेत राहावं लागणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला मुकणार आहे. बंगालच्या आकाश दीपसाठी कोलकाता नाईट रायडर्सने 1 कोटीची मूळ किंमत देऊन संघात घेतलं होतं. पण आता या स्पर्धेत खेळणार नसल्याने कोलकात्याचा मोठा धक्का बसला आहे. कारण वेगवान गोलंदाजीची धार स्पर्धेपूर्वीच बोथट झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा तिसरा गोलंदाज या स्पर्धेला मुकला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सला मुस्तफिझुर रहमान ऐवजी ब्लेसिंग मुजरबानी मिळाला. पण हर्षित राणा आणि आकाश दीपची रिप्लेस काही मिळालेली नाही. त्यासाठी फ्रेंचायझीकडून शोध सुरू आहे. असं असातना श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मतीषा पथिराणा हा देखील दुखापतग्रस्त असल्याने टेन्शन वाढलं आहे. त्याच्यासाठी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने 18 कोटीची बोली लावली होती. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान दुखापत झाली आणि उर्वरित सामन्यातून आऊट झाला. त्यातून अजूनही सावरलेला नाही. अशा स्थितीत श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं की, जर पथिराणाने फिटेनस टेस्ट पास केली नाही तर त्याला आयपीएल खेळता येणार नाही. अशा स्थितीत मतिषा पथिराणा पहिल्या टप्प्यात खेळणार नाही हे स्पष्ट आहे. पण नंतर फिट होईल की नाही याबाबतही साशंकता आहे.

Follow Us