Video : कार्तिक त्यागीच्या वेगवान चेंडूवर संजू सॅमसन फसला, बॅट स्विंग व्हायच्या आतच स्टंप घेऊन गेला
IPL 2026, Sanju Samson vs Kartik Tyagi: आयपीएल स्पर्धेतील 22व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात संजू सॅमसनची झंझावात पाहायला मिळेल अशी स्थिती होती. पण त्याचं अर्धशतक होण्यापूर्वीच कार्तिक त्यागीने त्याला तंबूत पाठवलं.

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा या संजू सॅमसनवर खिळल्या होत्या. कारण त्याने यापूर्वीच्या सामन्यात शतकी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे तशाच कामगिरीची अपेक्षा होती. संजू सॅमसनने तशीच सुरूवात केली होती. पहिल्या तीन चेंडूवर चौकार मारून आपला हेतूही स्पष्ट केला होता. संजू सॅमसनने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले होते. त्यामुळे संजू सॅमसन अर्धशतकी खेळीसह पुढे आक्रमक फलंदाजी करेल, असा अंदाज क्रीडाप्रेमींनी बांधला होता. पण अर्धशतक पूर्ण होण्याआधीच कार्तिक त्यागीने त्याला तंबूत पाठवला. संजू सॅमसनचा खेळ 32 चेंडूत 48 धावांवर आटोपला.
आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात संजू सॅमसनला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फक्त 8 धावांची गरज होती. कार्तिक त्यागी गोलंदाजीसाठी समोर होता. त्याने पहिला चेंडू टाकला आणि संजू सॅमसननने उत्तुंग षटकार मारला. त्यामुळे अर्धशतकाच्या अगदी वेशीवर येऊ ठाकला. आता अर्धशतक होणार असंच क्रीडाप्रेमींना वाटलं. पण कार्तिक त्यागीने आपल्या भात्यातून वेगवान चेंडू काढला. कार्तिकने 148.1 किमी प्रति तास वेगाने चेंडू टाकला. हा चेंडू टाकल्यानंतर संजू सॅमसनला काही कळलंच नाही. चेंडू इतक्या वेगाने निघून गेला की संजू सॅमसनला तोल सांभाळता आला नाही. काही कळायच्या आतच स्टंप उडाल्या.
Timber Strike! \|/
🎥 Talk about that for a comeback from Kartik Tyagi 🔥
Updates ▶️ https://t.co/jWkXVCPxj5#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvKKR | @KKRiders pic.twitter.com/eNcafwzEhU
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2026
कार्तिक त्यागीच्या या चेंडूची समालोचकांनी स्तुती केली. कारण संजू सॅमसन टिकला असता तर चित्र काही वेगळं असता. संजू सॅमसनने हा चेंडू स्क्वेअरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. पण बॅट स्विंग चेंडूवर पोहोचण्याआधीच स्टंप घेऊन गेला. संजू सॅमसन या चेंडूवर फटका मारताना चुकला. कार्तिक त्यागीने कोलकाता नाईट रायडर्ससाठी 4 षटकांचा स्पेल टाकला. त्याने 35 धावा देत 2 गडी बाद केले. यावेळी त्याच्या षटकात इकोनॉमी रेट 8.80चा होता.