KKR vs RCB : सलग 2 सामन्यानंतर केकेआर एक्शन मोडमध्ये; पंजाब विरुद्ध प्लेइंग 11 मध्ये बदल फिक्स!
IPL 2026 KKR vs RCB : कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील आपल्या तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध 2 हात करणार आहे. केकेआर या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.

कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) आपल्या तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध 2 हात करणार आहे. उभयसंघातील हा सामना सोमवारी 6 एप्रिलला होणार आहे. सामना कोलाकातामधील इडन गार्डन्समध्ये होणार आहे. केकेआरला अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यर याने पंजाब किंग्सला पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे पंजाब सोमवारी सलग तिसरा सामना जिंकून विजयी हॅट्रिक करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला केकेआरसमोर पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे केकेआर सलग 2 पराभवानंतर घरच्या मैदानात होणाऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निमित्ताने केकेआरची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असेल? हे आपण जाणून घेऊयात.
केकेआर-पंजाब हेड टु हेड
कोलकाता विरुद्ध पंजाब यांच्यात सोमवारी होणारा एकूण 36 वा सामना असणार आहे. केकेआरने पंजाब विरुद्ध या 35 पैकी 21 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पंजाबने कोलकाताला 13 वेळा पराभूत केलं आहे. तर उभयसंघातील 1 सामना रद्द करण्यात आला.
इडन गार्डन्समधील खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक
इडन्स गार्डन्समधील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असल्याचं म्हटलं जातं. तसेच सामन्याच्या सुरुवातीला या मैदानात गोलंदाजांना खेळपट्टीतून मदत मिळते. मात्र त्यानंतर खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते.
केकेआरची पंजाब विरूद्धच्या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन एलन, अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, रिंकू सिंह (उपकर्णधार), रमनदीप सिंह, सुनील नारायण, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, कार्तिक त्यागी, ब्लेसिंह मुजरबानी.