AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prince Yadav : प्रिंस यादवचं स्वप्न पूर्ण होणार;टीम इंडियात बुमराहच्या जागी खेळणार?

Prince Yadav: प्रिंस यादव याने आयपीएल 2026 स्पर्धेत आतापर्यंत बॉलिंगने आपला ठसा उमटवला आहे. बीसीसीआय 10 सामन्यांत 19 विकेट्स मिळवणाऱ्या या गोलंदाजाला टीम इंडियात संधी देणार असल्याचं म्हटलं जात आहे. जाणून घ्या.

Prince Yadav : प्रिंस यादवचं स्वप्न पूर्ण होणार;टीम इंडियात बुमराहच्या जागी खेळणार?
Prince Yadav and Jasprit BumrahImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 08, 2026 | 5:37 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात युवा वेगवान गोलंदाज प्रिंस यादव हा लखनौ सुपर जायंट्सचं टीमचं प्रतिनिधित्व करत आहे. आपल्याला आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांसह खेळायचंय, अशी इच्छा प्रिंस यादव याने बोलून दाखवलीय. तसेच प्रिंसने गुरुवारी 7 मे रोजी आरसीबी विरूद्धच्या सामन्यात एकाना स्टेडियममध्ये विराट कोहली याच्या सारख्या अनुभवी आणि दिग्गज फलंदाजाला झिरोवर आऊट केलं. विशेष म्हणजे बॅटिंगने चेंडूची कत्तल करणाऱ्या विराटला प्रिंसने बोल्ड केलं. प्रिंसने विराटला बोल्ड करुन क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर आता प्रिंसचं टीम इंडियासाठी खेळण्याचं स्वप्न होऊ शकतं, असं म्हटलं जात आहे.

प्रिंसला टी 20 टीम इंडियात चक्क यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याच्या जागी खेळण्याची संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाच्या 2026 च्या टी 20i वर्ल्ड कप विजयानंतर जसप्रीत बुमराहसाठी बीसीसीआय वर्कलोड मॅनेजमेंटनुसार प्लान तयार करत आहे.

बीसीसीआयचा प्लान काय?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय बुमराहला दीड ते 2 वर्षांसाठी टी 20 टीममधून विश्रांती देणार असल्याचं म्हटलं जात आहे. बुमराहला कसोटी क्रिकेट (WTC) आणि आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 स्पर्धेत पूर्ण ताकदीने खेळता यावं यासाठी त्याला एकदिवसीय आणि इतर मालिकेतून विश्रांती देण्यात येणार असल्याचा प्लान बीसीसीआयचा आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

त्यामुळे आता बुमराहच्या जागी प्रिंसला टी 20 टीम इंडियात संधी देण्याची तयारी सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. प्रिंसने आयपीएल 2026 स्पर्धेत आपल्या स्विंगच्या जोरावर फलंदाजांना गुंडाळलं आहे. तसेच क्रिकेट चाहत्यांना प्रभावित केलंय. त्यामुळे आता प्रिंसला संधी मिळणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रिंस यादव याची आयपीएल कारकीर्द

दरम्यान प्रिंस यादव याचा आयपीएल कारकीर्दीतील दुसरा मोसम आहे. प्रिंसने आतापर्यंत लखनौचं 10 सामन्यांत प्रतिनिधित्व केलं आहे. प्रिंसने एकूण 16 आयपीएल विकेट्स मिळवल्या आहेत. प्रिंसने या दरम्यान 8.8 च्या सन्मानजनक इकॉनमीने धावा दिल्या. तसेच प्रिंस 19 व्या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?